महाराष्ट्र केसरीच्या मिरवणुकीत मोडला नियम; डीजे मालकावर लोणीकंद पोलिसांत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:15 PM2018-01-13T13:15:48+5:302018-01-13T13:18:35+5:30

डीजे वाजविण्यावर बंदी असताना तो वाजविल्यामुळे डीजे मालकावर लोणीकंद पोलीसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. पै. अभिजित कटके यांचा वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सभारंभ व भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

Rules broken into Maharashtra Kesari rally; crime filled against DJ owner in Loni kand police | महाराष्ट्र केसरीच्या मिरवणुकीत मोडला नियम; डीजे मालकावर लोणीकंद पोलिसांत गुन्हा

महाराष्ट्र केसरीच्या मिरवणुकीत मोडला नियम; डीजे मालकावर लोणीकंद पोलिसांत गुन्हा

Next
ठळक मुद्देबंदी असतानाही मिरवणुकीत वाजविण्यात आला होता डीजेकोणीही असले, तरी कायद्यासमोर भेदभाव केला जाणार नाही : सर्जेराव पाटील

वाघोली : येथील महाराष्ट्र केसरी झालेला पै. अभिजित कटके यांचा वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सभारंभ व भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत डीजे वाजविण्यात आला होता. डीजे वाजविण्यावर बंदी असताना तो वाजविल्यामुळे डीजे मालकावर लोणीकंद पोलीसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मिरवणुकीमध्ये डीजे लावल्याप्रकरणी साउंड सिस्टीमचे चालक व वाघोलीतील ग्रामस्थ यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजेश गायकवाड यांनी फिर्याद दिली असून मच्छिंद्र मारुती कटके, शुभम साउंड सिस्टीमचे सुरेश पवार यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याच्या विजयी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डीजे लावण्यात आला होता.  

पोलिसांच्या व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोणीही डीजे लावला, तर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे आम्ही ही कारवाई केली आहे. कोणीही असले, तरी कायद्यासमोर भेदभाव केला जाणार नाही. 
- सर्जेराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे

Web Title: Rules broken into Maharashtra Kesari rally; crime filled against DJ owner in Loni kand police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.