पोलिसांनी परवानगी नाकारली; मराठा बांधव चौकीतच बसले आंदोलनाला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 02:16 PM2024-02-16T14:16:29+5:302024-02-16T14:17:46+5:30

सकल मराठा बांधवांच्या वतीने आरक्षणाबाबतीत रास्ता रोको करण्यासाठी पोलीस चौकीला परवानगीची मागणी केली होती

The police refused permission The Maratha brothers sat in the protest | पोलिसांनी परवानगी नाकारली; मराठा बांधव चौकीतच बसले आंदोलनाला

पोलिसांनी परवानगी नाकारली; मराठा बांधव चौकीतच बसले आंदोलनाला

वाघोली : वाघोली मध्ये सकल मराठा बांधवांच्या वतीने आरक्षणाबाबतीत रास्ता रोको करण्यासाठी व जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात यासाठी सकल मराठा बांधवांच्या वतीने वाघोली पोलीस चौकीला परवानगीची मागणी केली. ती पोलिसांनी नाकारल्याने पोलीस चौकीतच मराठा बांधवांचे आंदोलन सुरू झाले.
 
यावेळी वाघोली परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने वाघोली पोलीस चौकीतच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा,जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मराठा बांधवांच्या वतीने ACP संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: The police refused permission The Maratha brothers sat in the protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.