दीड वर्षापूर्वीच झाले होते लग्न; टेम्पो-दुचाकीच्या अपघातात शिक्षकाने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 11:38 AM2023-07-01T11:38:53+5:302023-07-01T11:39:03+5:30

शिक्षकाच्या शाळेस अनुदान नसल्याने उदरनिर्वाहासाठी ते रात्रीचे कंपनीवर सुरक्षारक्षकाचे काम करत होते

The marriage took place a year and a half ago; A teacher lost his life in a tempo-bike accident | दीड वर्षापूर्वीच झाले होते लग्न; टेम्पो-दुचाकीच्या अपघातात शिक्षकाने गमावला जीव

दीड वर्षापूर्वीच झाले होते लग्न; टेम्पो-दुचाकीच्या अपघातात शिक्षकाने गमावला जीव

googlenewsNext

पौड : धनवेवाडी (ता. मुळशी) बस स्टाॅपजवळ टेम्पो आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पंकज रमाकांत धसवडीकर (वय ३० वर्षे, रा. धसवडी पो. खंडाळी, ता. अहमदपूर, जि. लातूर, सध्या रा. पौड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज रमाकांत धसवडीकर हे मोटारसायकलवरून पौडकडे जात असताना धनवेवाडी बस स्टाॅपजवळ टेम्पो बरोबर अपघात होऊन ते जखमी झाले होते. लवळे येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याच्यावर उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. पंकज हे केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रमशाळा पौड येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र शाळेस अनुदान नसल्याने उदरनिर्वाहासाठी ते रात्रीचे कंपनीवर सुरक्षारक्षकाचे काम करत होते. ते कामावरून घरी येत असताना सकाळी हा अपघात घडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे लग्न दीड वर्षापूर्वीच झाले होते.

Web Title: The marriage took place a year and a half ago; A teacher lost his life in a tempo-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.