थंडी ओसरली, उकाडा सुरू...! पुणेकरांना आता घाम फुटणार

By श्रीकिशन काळे | Published: February 8, 2024 03:51 PM2024-02-08T15:51:38+5:302024-02-08T15:52:09+5:30

सध्या राज्यातही गारठा कमी झाला असून उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ होत आहे

The cold is over the heat is on Pune residents will start sweating now | थंडी ओसरली, उकाडा सुरू...! पुणेकरांना आता घाम फुटणार

थंडी ओसरली, उकाडा सुरू...! पुणेकरांना आता घाम फुटणार

पुणे : थंडी ओसरू लागली असून, हळूहळू उकाड्यात वाढ होत आहे. पुण्यातील किमान तापमानात देखील वाढ झाली आहे. किमान तापमान हे १५ अंश सेल्सिअसवर नोंदवले जात आहे कमाल तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना आता घाम फुटणार आहे. 

सध्या राज्यात गारठा कमी झाला आहे. तर उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ होत आहे. राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पारा ३५ अंशांच्या वर गेलेला आहे. तापमानात वाढ झाली असली तरी विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. येत्या ९ तारखेपासून राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  दरम्यान, उत्तर भारतातील थंडीचा कडाका कमी-अधिक जाणवत आहे. पूर्व विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण आहे. परिणामी उद्यापासून पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

पुणे शहरातील किमान तापमान

शिवाजीनगर : १४.०
पाषाण : १५.१
कोरेगाव पार्क : १९.०
मगरपट्टा : २१.४
वडगावशेरी : २१.८

Web Title: The cold is over the heat is on Pune residents will start sweating now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.