चाकूचा धाक दाखवून महाळुंग्यातून सिगारेट कंपनीच्या मालासह पळविला टेम्पो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 10:10 PM2018-01-10T22:10:36+5:302018-01-10T22:10:54+5:30

चाकण येथील एमआयडीसीतील महाळुंगे इंगळे गावच्या हद्दीतून सिगारेट कंपनीच्या मालासह कार आडवी घालून चौघांनी चाकूचा धाक दाखवून टेम्पो पळविला

Tempo ran away with cigarette company's goods from the cavalcade | चाकूचा धाक दाखवून महाळुंग्यातून सिगारेट कंपनीच्या मालासह पळविला टेम्पो

चाकूचा धाक दाखवून महाळुंग्यातून सिगारेट कंपनीच्या मालासह पळविला टेम्पो

Next

चाकण : चाकण येथील एमआयडीसीतील महाळुंगे इंगळे गावच्या हद्दीतून सिगारेट कंपनीच्या मालासह कार आडवी घालून चौघांनी चाकूचा धाक दाखवून टेम्पो पळविला असून, चोरट्याने टेम्पो, माल, सोन्याची अंगठी, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण पावणेअकरा लाखांचा ऐवज लुटला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेआठ ते आज ( ता. १० ) पहाटे एकच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावरील महाळुंगे गावच्या हद्दीत बजाज ऑटोच्या गेट समोर घडला. आयकॉन कार क्रमांक एमएच-१२-सीडी-७६३९ मधून आलेल्या चौघांनी टेम्पोला डाव्या बाजूने क्रॉस करून गाडी आडवी घालून वाहन चालकाला चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ व दमदाटी केली. आणि पावणे पाच लाख रुपये किमतीच्या सिगारेट कंपनीचा माल भरलेला टेम्पो व सहा लाख किमतीचा टेम्पो क्रमांक एमएच-११-बीएल-७४७५, अर्धा तोळा सोन्याची अंगठी, साडेपाच हजाराची रोख रक्कम व एक मोबाईल, असा ऐवज लुटून नेला. याबाबतची फिर्याद समाधान उर्फ संभाजी जगन्नाथ चव्हाण ( वय ३५, रा. फडतरवाडी, पो. झिहे, ता. जि. सातारा ) यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Tempo ran away with cigarette company's goods from the cavalcade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.