‘आकृती’मध्ये तांत्रिक गुणवत्तेचा आविष्कार; डीआरडीओतर्फे संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:25 PM2018-02-06T12:25:26+5:302018-02-06T12:30:49+5:30

पुण्यातील एआयटी येथे इंजिनिअरिंग अँड टेक्निकल बोर्डातर्फे आयोजिण्यात आलेला तांत्रिक महोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी तसेच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी सादर केलेले विविध प्रकल्प या महोत्सवाचे आकर्षण ठरले.

The technological quality invention in 'Aakruti'; Demonstration of protection technology by DRDO | ‘आकृती’मध्ये तांत्रिक गुणवत्तेचा आविष्कार; डीआरडीओतर्फे संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

‘आकृती’मध्ये तांत्रिक गुणवत्तेचा आविष्कार; डीआरडीओतर्फे संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

Next
ठळक मुद्दे१,२०० विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग घेऊन विविध प्रकल्पांचे केले सादरीकरणएआयटीच्या दिघी कॅम्पसमध्ये आयोजिण्यात आला होता ‘आकृती’ महोत्सव

पुणे : पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एआयटी) येथे इंजिनिअरिंग अँड टेक्निकल बोर्डातर्फे आयोजिण्यात आलेला तांत्रिक महोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी तसेच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी सादर केलेले विविध प्रकल्प या महोत्सवाचे आकर्षण ठरले. जवळपास १,२०० विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग घेऊन विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले. 
वार्षिक सांस्कृतिक व तांत्रिक उपक्रमांचा एक भाग म्हणून आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एआयटी)च्या दिघी कॅम्पसमध्ये ‘आकृती’ हा महोत्सव आयोजिण्यात आला होता. आठवडाभर रंगलेल्या या महोत्सवात विविध तांत्रिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
तांत्रिक आकृती हा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धात्मक उपक्रम असून त्यात टेक्निकल चषकासाठी एआयटीच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी स्पर्धा केली. कोड रेड आणि ब्लाइंड कोडिंग, एनएएनडी इट आणि पीसीबी डिझायनिंगसारखे इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित कार्यक्रम, कॉण्ट्राप्शन आणि आॅटोकॅडसारख्या मेकॅनिकल इव्हेंट्सपासून रोबोटिक्सपर्यंतच्या अनेक तांत्रिक प्रकल्पांचे सादरीकरण या महोत्सवात विद्यार्थ्यांनी केले.
आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक महोत्सव ‘सोल्यूशन्स २०१८’  हा एआयटीतर्फे आयोजिण्यात आलेला दुसरा इव्हेंट आहे. ‘भारत - विकसनशीलतेकडून विकसित होण्याकडे’ या थीमवर हा उपक्रम आधारित होता. संगणक, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, रोबोटिक्स, गेमिंग आणि पेपर प्रेझेंटेशन या विभागांमध्ये आयोजिण्यात आलेल्या या महोत्सवातील एकूण ३५ इव्हेंटमध्ये २१ शिक्षण संस्थांतील १,२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुयोग्य व सशक्त स्पर्धात्मक दृष्टिकोनासह सीओईपी, पीआयसीटी, व्हीआयटी, व्हीआयआयटी आणि एमआयटीसारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची लढत झाली. यातील रोबोटिक्स इव्हेंटमध्ये सीएमई आणि एनडीएचे स्पर्धक संघही सहभागी झाले होते. 
‘स्टुडंट अ‍ॅप्टिट्यूड आॅलिम्पियाड’ हा यंदा प्रथमच सादर केलेला वैशिष्ट्यपूर्ण इव्हेंट होता. यात आर अँड डीई, एपीएस खडकी, एपीएस दिघी, एपीएस पुणे आणि एपीएस खडकवासला या संस्थांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतला. प्रसिद्ध व्यक्तींची विशेष व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजिण्यात आली होती.

क्षेपणास्त्र, रणगाडे ठरले आकर्षण
डीआरडीओचे (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन) सहसंचालक आलोक मुखर्जी यांच्यातर्फे आयोजिण्यात आलेले डीआरडीओ प्रदर्शन हे या महोत्सवाचे आकर्षण ठरले. त्याचसोबत, महत्त्वाच्या ठरलेल्या आर अँड डीई प्रदर्शनात क्षेपणास्त्रे आणि रणगाड्यांसारख्या विविध शस्त्रांची मॉडेल ठेवण्यात आली होती. या मॉडेलच्या माध्यमातून युद्धाच्या विविध पद्धती आणि त्यातील तांत्रिक प्रगतीची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

Web Title: The technological quality invention in 'Aakruti'; Demonstration of protection technology by DRDO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.