शिक्षक दाम्पत्यांची ‘अधुरी कहाणी’ पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 06:44 AM2017-07-26T06:44:54+5:302017-07-26T06:44:55+5:30

पाच वर्षांपासून रखडलेली आतंरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियामंगळवारी पुणे जिल्हा परिषदेत ती राबविण्यात आली. गेली १० ते १५ वर्षे कुटुंबीयांपासून दूर राहिलेल्या ९५ शिक्षकांना पती-पत्नी एकत्रीकरणातून

Teachers story , pune, news | शिक्षक दाम्पत्यांची ‘अधुरी कहाणी’ पूर्ण

शिक्षक दाम्पत्यांची ‘अधुरी कहाणी’ पूर्ण

Next

पुणे : पाच वर्षांपासून रखडलेली आतंरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियामंगळवारी पुणे जिल्हा परिषदेत ती राबविण्यात आली. गेली १० ते १५ वर्षे कुटुंबीयांपासून दूर राहिलेल्या ९५ शिक्षकांना पती-पत्नी एकत्रीकरणातून एकमेकांजवळ येता आले. त्यामुळे गेली अनेक वर्षे ऐकमेकांशिवाय सुरू असलेली संसाराची ‘अधुरी कहाणी ’ खºया अर्थाने पूर्ण झाल्याच्या भावना ‘लोकमत’शी बोलताना काही शिक्षकांनी व्यक्त केल्या. राज्यात सुमारे १२ हजार अशी शिक्षक दाम्पत्ये एकेमेकांपासून दूर राहत आहेत.
लग्नानंतर १0 ते १५ वर्षे दूर राहिल्याने अनेक शिक्षकांचे संसार घटस्फोटाच्या वळणावर येऊन थांबला होता. अनेक दाम्पत्यांची भेट महिना महिना होत नव्हती. ना आई बाबांचे दर्शन ना बायका लेकरांची भेट. अशा कौैटुंबिक ताणतणावात जिल्हा परिषदेतील शिक्षक दाम्पत्य शिक्षणसेवेचे काम करीत होते.
समान जात संवर्गाच्या जाचक अटीमुळे अनेक वर्षांपासून ते कटुंबापासून दूर राहत होती. गेली ५ वर्षे आंतरजिल्हा बदली प्रक़्रिया राबवली न गेल्यामुळे त्यांना स्वजिल्ह्यात येता येत नव्हते. अखेर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. आज जिल्हा परिषदेत ३१९ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून स्वजिल्ह्यात शाळा देण्यात आली असून यात ९५ शिक्षक हे पती पत्नी एकत्रीकरणातून आले आहेत. यात पती किंवा पत्नी हे दुसºया जिल्ह्यात नोकरी करीत होते. यातील तीन शिक्षक दाम्पत्य दोघेही बाहेरून आले आहेत.
यावेळी विजय घोळवे या शिक्षकाशी संपर्क साधला असता, मी १७ वर्षे सातारा जिल्ह्यात नोकरी करीत असून माझे कुटुंब हे बारामतीत राहते. अनेक अडअडणीच्या वेळी माझी गरज असतानाही मी त्यांच्याबरोबर नव्हतो. आता मी कुटुंबियांजवळ आल्याने आतापर्यंत माझी राहिलेली उणीव भरून काढणार आहे. विजय यांच्या पत्नी जयश्री यांच्याशी म्हणाल्या, १३ वर्षे आमच्या लग्नाला झाली पण एकमेकांना आमचा तसा काही उपयोग होत नव्हता. आता झालं एकदाचं...आंम्ही अखेर आता खºया अर्थाने एकत्र येणार असल्याचा आनंद मोठा आहे.
शिक्षक भीमदेव जाधव यांनी मला खूप आनंद झाला. जिल्ह्यात बदली करून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र काही उपयोग झाला नाही. मात्र शासनाने ही आॅनलाईन प्रक्रिया राबविली असल्यामुळे कोणत्याही वशील्याविना, पारदर्शकपणे कटुंबाजवळ येता आले. आता घरी सुखासमानधानाने राहता येईल. त्यांच्या पत्नी स्वाती जाधव यांनी तर आजचा दिवस हा मोलाचा ठरला अशी भावना व्यक्त केली. खूप दिवसांची प्रतिक्षा संपली, असे सांगत ८0 टक्के लोकांची यामुळे सोय झाली आहे. यामुळे नव्याने चांगले वातावरण निर्माण होवून आंम्ही हे पती पत्नी चांगली शिक्षणसेवा देतील. आमच्यापेक्षाही काही जणांचे खूपच वाईट परिस्थिती होती. त्यांना जवळ येता आले.
जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये शिक्षकांच्या ८५३ जागा रिक्त आहेत. ६०६ जागा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार आहेत; परंतु ३ टक्के या जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत. त्यांपैकी ५१२ जागा भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आंतरजिल्हा बदलीतून ४१९ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. त्यांची सेवाज्येष्ठतेनुसार आॅनलाईन (समुपदेशन) भरती जिल्हा परिषदेच्या शरद पवार सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. आज ३१९ जागा आदीवासी, अवघड व सोप्या अशा तीन क्षेत्रात या बदल्या करण्यात आल्या. यात बारामती, इंदापूर, पुरंदर, आंबेगाव या तालुक्यांतील जागांना शिक्षकांनी पसंती दिली. येथील दाखविलेल्या सर्वच रिक्त जागा आज भरल्या गेल्या.

Web Title: Teachers story , pune, news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.