विद्यार्थी जुन्याच गणवेशावर! अद्याप पैैसे खात्यात आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:52 AM2018-07-12T01:52:40+5:302018-07-12T01:52:59+5:30

शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत तथा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. मात्र खरेदी करावयाची शालेय रक्कम विलंब झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १६ दिवस झाल्यानंतरही जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.

Students are on the old uniform! There are no accounts yet | विद्यार्थी जुन्याच गणवेशावर! अद्याप पैैसे खात्यात आलेच नाहीत

विद्यार्थी जुन्याच गणवेशावर! अद्याप पैैसे खात्यात आलेच नाहीत

Next

कान्हूर मेसाई - शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत तथा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. मात्र खरेदी करावयाची शालेय रक्कम विलंब झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १६ दिवस झाल्यानंतरही जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.
दरम्यान, प्रशासकीय प्रक्रियेत आणखी दिवस जाणार आहेत. केंद्र सरकारने गत काही महिन्यांत देशात सुरू असलेल्या सर्व शिक्षा अभियानाला समग्र शिक्षा अभियानात समाविष्ट केले आहे. केंद्रच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकारात येत असलेल्या या समग्र शिक्षा अभियानाकडून राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेशासाठी आत्तापर्यंत ४00 रुपये दिले जायचे. मात्र एवढ्या अल्पशा रकमेत दोन गणवेश बसणार कसे? याबाबत ओरड झाल्याने या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून २00 रुपयांची वाढ करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यासाठी ६00 रुपयांची तरतूद केली आहे.
या वर्षी शालेय व्यवस्थापन समितीकडे गणवेशाचा निधी सोपवून विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. असे असले तरी १५ जूनला शाळा सुरू झाल्यानुसार मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच वाटप करण्यात
आली. त्याप्रमाणेच मोफत गणवेशदेखील पहिल्या दिवसापासूनच मिळणे अपेक्षित होते. मात्र शालेय गणवेशासाठीचा निधीला विलंब झाल्याने आतापर्यंत जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.
पंचायत समितीकडे निधी सुपूर्त केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गटविकास अधिकारी संदीप जठार याना विचारले असता, गणवेश निधी जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावरून शाळेकडे पात्र विद्यार्थी संख्येनुसार निधी वितरित केला जाईल. त्यानुसार हा निधी शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करून विद्यार्थ्यांना गणवेश वितरण केले जाणार आहे. हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी कान्हूर मेसाई येथील माजी उपसरपंच दीपक तळोले व माजी ग्रामपंचायत सदस्य बबनराव शिंदे यांनी केली आहे.

शालेय व्यवस्थापन समितीची मुख्य भूमिका!

शालेय शिक्षण विभागाने गतवर्षी विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त बँक खात्यावर गणवेशाची रक्कम जमा केली. मात्र, त्या निर्णयाचा मोठा फटका शालेय गणवेश वितरण प्रक्रियेला बसला होता. तो अनुभव
लक्षात घेता या वर्षी संयुक्त बँक खात्यावर रक्कम जमा न करता शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका मुख्य राहणार आहे.

गेल्या वर्षीपासून गणवेशाचे पैैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरूवात केली. यामुळे अर्धे वर्षे बँकेत खाती काढण्यात गेली. त्यानंतर काहींचे पैैसे झाले तर काहींना पैैसै मिळालेच नाहीत. त्यामुळे गेले वर्षे गणवेशा विनाच गेले.

या वर्षी तरी वेळेत प्रक्रिया होवून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Students are on the old uniform! There are no accounts yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.