विद्यार्थिनीला काढले हॉस्टेलमधून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:38 AM2018-06-24T03:38:22+5:302018-06-24T03:38:24+5:30

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर रूममध्ये सामान घेऊन जाताना झालेल्या किरकोळ वादातून त्या विद्यार्थिनीची रूम परत घेऊन तिला हॉस्टेलमधून बाहेर काढण्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी घडला.

Student left out of hostel removed | विद्यार्थिनीला काढले हॉस्टेलमधून बाहेर

विद्यार्थिनीला काढले हॉस्टेलमधून बाहेर

Next

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर रूममध्ये सामान घेऊन जाताना झालेल्या किरकोळ वादातून त्या विद्यार्थिनीची रूम परत घेऊन तिला हॉस्टेलमधून बाहेर काढण्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी घडला. यावेळी पालकांना अत्यंत वाईट वागणूक देण्यात आल्याचा आरोप त्यांनी
केला आहे.
चंद्रपूर येथील एक विद्यार्थिनी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षाला शिकत आहे. शुक्रवारी घडलेल्या प्रकाराबद्दल पालकांनी दिलेली माहिती अशी, की आम्ही शुक्रवारी मुलीच्या महाविद्यालय व हॉस्टेलमधील प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर हॉस्टेलमध्ये गेलो. तिच्याकडे सामान जास्त असल्याने ते रूममध्ये नेण्यासाठी तिने तिथल्या कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे सामान आतमध्ये घेऊन जाण्यासाठी आईला सोबत घेऊन जाण्याची तिने विंनती केली. मात्र त्यालाही नकार देण्यात आला. यावेळी तिथल्या कर्मचाºयांशी आमची किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर तिथल्या कर्मचाºयांनी आम्हाला हॉस्टेलमध्ये न जाऊ देता वसतिगृहाचे प्रमुख श्रीधर व्हनकट्टी यांच्याकडे पाठविले. व्हनकट्टी यांनी अत्यंत कडक भूमिका घेऊन त्या मुलीच्या रूमला टाळे ठोका आणि तिचा प्रवेश रद्द करा, असे आदेश दिले. त्यानंतर खूप विनवण्या करून तसेच व्हनकट्टी सरांच्या हातापाया पडल्या. आईच्या डोळयातून अखंड अश्रू वाहू लागले. तरीही त्यांनी हॉस्टेलला प्रवेश देणार नाही, अशी भूमिका घेतली. या साºया प्रकरणाचा प्रचंड मानसिक त्रास आम्हांला सहन करावा लागला, असे मुलीच्या पालकांनी सांगितले.
श्रीधर व्हनकट्टी यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की ‘‘कॉलेजच्या नियमानुसार हॉस्टेलमध्ये पालकांना कुठल्याही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांना सामान घेऊन जाण्यासाठी आतमध्ये सोडण्यात आले नाही. त्यावरून तिच्या पालकांनी तिथे गोंधळ घातला. त्यांनी त्यांच्या मुलीलाच शिवीगाळ केली. हॉस्टेलच्या नियमाला धरून हे नसल्यामुळे आम्ही त्या विद्यार्थिनीचा हॉस्टेलमधील प्रवेश रद्द केला.’’
शनिवारी या प्रकरणाची माहिती विद्यार्थ्यांना मिळताच त्यांनी प्राचार्यांना घेराव घालून याचा जाब विचारला. त्यावेळी प्राचार्यांनी त्या मुलीला हॉस्टेलमध्ये पुन्हा प्रवेश देत असल्याचे सांगितले. या प्रकरणामध्ये पालकांना अपमानास्पद वागणूक देणाºया वसतिगृह प्रमुखांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस कुलदीप आंबेकर यांनी केली आहे. शुक्रवारी घडलेल्या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल संस्थेला सोपविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Student left out of hostel removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.