विद्यार्थ्याने भंगारातून बनवली नवी कोरी दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:41 AM2018-03-16T00:41:42+5:302018-03-16T00:41:42+5:30

लहानपणापासून दुचाकीचे वेड... आपले गाडी बनवण्याचे वेड पूर्ण करण्यासाठी निडगी येथून आणलेल्या स्क्रॅब गाडीच्या सांगाड्यावर दिवस-रात्र मेहनत घेत सोमेश्वर येथीळ एका तरुणाने चक्क ३० हजार खर्च करून भंगारातून तब्बल १ लाख ५० हजारांची गाडी बनवली.

The student got a new blanket bicycle from the barn | विद्यार्थ्याने भंगारातून बनवली नवी कोरी दुचाकी

विद्यार्थ्याने भंगारातून बनवली नवी कोरी दुचाकी

Next

सोमेश्वरनगर : लहानपणापासून दुचाकीचे वेड... आपले गाडी बनवण्याचे वेड पूर्ण करण्यासाठी निडगी येथून आणलेल्या स्क्रॅब गाडीच्या सांगाड्यावर दिवस-रात्र मेहनत घेत सोमेश्वर येथीळ एका तरुणाने चक्क ३० हजार खर्च करून भंगारातून तब्बल १ लाख ५० हजारांची गाडी बनवली. रत्नसिंह गाडगे असे या तरुणाचे नाव असून त्याची गाडी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या रत्नसिंहला लहानपणापासूनचदुचाकी गाड्यांचे वेड आहे. आई-वडील दोघे प्राथमिक शिक्षक आहेत. या वेडापायी त्याने सोमेश्वरनगर येथील इंजिनिरिंगच्या मेकॅनिकल शाखेत प्रवेश घेतला. गेल्यावर्षी स्क्रॅप झालेली गाडी त्याने आणली. गाडीची स्थिती बघता सर्वांनीच त्याचा गाडी आणण्याचा निर्णय चुकीचा ठरवला. शेजारी दिलीप सोरटे यांच्या जुन्या दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये नवीन बाईक बनवण्याचे त्याचे काम सुरू झाले. गाडीचे नवीन भाग घेण्यासाठी स्वत:जवळचे साठवलेले पैसे कामी आले. मग हळूहळू एक एक भाग मिळवले. त्याचे मित्र सूरज जाधव व अतुल होळकर यांनी नीरा येथील अस्लम पठाण यांच्याशी संपर्क केला, त्यांनी पार्ट शोधून देण्याची तयारी दाखवली. मुंबई येथून त्यांच्या गॅरेजमध्ये साहित्य त्याने आणले. येथील अविनाश गायकवाड यांनी गाडीचे रंगाचे काम करण्याची तयारी दर्शवली. रत्नसिंहने स्वत: गाडीचे सॉफ्टवेअरचे डिजाईन तयार केले. गाडीच्या लिवरचे डिजाईन शेजारीच स्वप्निल गायकवाडसह त्याने राम आर्टस येथे तयार केले. गाडीचा पुढील हेडलाईट अद्याप मिळालेला नव्हता. तो वडगाव येथील प्रवीण चोरगे व महेश चोरगे या बंधूंनी शोधून दिला. २८ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री उशिरा त्यांच्याशी बोलत असताना फोनवरून त्यांनी फ्यूज पाहून तो जळाला असल्याचे पाहिले. गायकवाड यांनी त्यांच्याकडील वायर दिली आणि त्यादिवशी त्याची दुचाकी जिवंत झाली. अगदी टारझन चित्रपटच आठवला. राहिलेले भाग बसवण्यासाठी येथील प्रवीण सोरटे यांनी होकार दिला. शोरूमचे वर्कशॉप मॅनेजर तांबवे, संदीप वाइकर, जावेद तसेच इतर सर्व स्टाफ ने मदत केली. दि. ३ जानेवारी २०१८ रोजी गाडी नवीन स्थितीत तयार झाली. आठ हजारातून भंगारातून आणलेल्या गाडीला ३० हजार खर्च करून रत्नसिंह ने १ लाख ५० हजाराची गाडी बनविली.

Web Title: The student got a new blanket bicycle from the barn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.