रामटेकडी प्रकल्पाविरोधात कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 02:44 PM2017-10-01T14:44:45+5:302017-10-01T14:52:43+5:30

रामटेकडी कचरा प्रकल्पाच्या विरोधात भाजपा वगळता सर्व पक्षीय व कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्यावतीने आज मोर्चाकडून महापौर, महापालिका, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.

The struggle for the removal of garbage project against the Ramtekdi project | रामटेकडी प्रकल्पाविरोधात कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीचा मोर्चा

रामटेकडी प्रकल्पाविरोधात कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीचा मोर्चा

Next
ठळक मुद्देहडपसर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणावर धोका पुणे शहरात एकूण १६०० टन कचरा दररोज तयार होतो, त्यापैकी १०० टन कचरा हा वडगाव व बाणेर येथील कचरा प्रकल्पात जिरवला जातो पालिका आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.

हडपसर : रामटेकडी येथील हडपसर औद्योगिक वसाहतीमधील पुणे महानगरपालिका १३ एकर जागेवर कचरा प्रकल्प सुरु करण्याचा घाट घालत आहे. त्या प्रकल्पाच्या विरोधात भाजपा वगळता सर्व पक्षीय व कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्यावतीने आज मोर्चाकडून महापौर, महापालिका, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. या मोर्च्यात हजारो नागरिक नागरिक उपस्थित होते.
यापूर्वी हडपसर मध्ये हंजर बायोटेक, दिशा वेस्ट मॅनेजमेन्ट, अजिंक्य, रोकेम, जनावरे जाळण्याचा कारकस प्रकल्प, कँटोन्मेंट कचरा प्रकल्प इ प्रकल्प हडपसर परिसरात असून गेली अनेक वर्षे हडपसरचे नागरिक हा कचरा सहन करावा लागत आहे.
पुणे शहरात एकूण १६०० टन कचरा दररोज तयार होतो, त्यापैकी १०० टन कचरा हा वडगाव व बाणेर येथील कचरा प्रकल्पात जिरवला जातो व उर्वरित १५०० टन कचरा हा हडपसर परिसरात येतो आणि आणखी कचरा हडपसर परिसरात आल्यास त्यामुळे हडपसर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, महादेव बाबर, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, नगरसेवक योगेश ससाणे, प्रमोद भानगिरे, बंडू गायकवाड, नंदा लोणकर, अशोक कांबळे, आनंद अलकुंटे, विजय देशमुख, सुनील बनकर, वैभव माने  यांच्या सह येथील हजारो नागरिक  या मोर्चात सहभागी झाले होते.


या  प्रकल्पांमुळे संपूर्ण हडपसर परिसरातील नागरिकांना डास, माशा, दुर्गंधी याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातच भर म्हणून आणखी १३ एकरावर नवीन प्रकल्प सुरु केल्यास हडपसरकरांच्या आरोग्यास आणखी प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो. हडपसरकरांनी सर्व पुण्याचा कचरा आणि कचºयाचा त्रास सहन करण्याचा काही ठेका घेतलेला नाही. यापूर्वी कारकस प्रकल्प, गुरांचे गोठे, डुकरांसाठीचे पुनर्वसन हे हडपसर परिसरात करण्यात आलेले आहे. याचा अर्थ पुणे शहरातील संपूर्ण वेस्ट मटेरियल फक्त आणि फक्त हडपसरच्या माथी मारण्याचा जो घाट प्रशासनाने आणि भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाºयांनी घातलेला आहे. याबाबत येथील भाजपा वगळता सर्व नगरसेवकांनी विरोध केला आहे. अनेक दिवसाच्या विरोधानंतर ही पालिका हा प्रकल्प करण्याच्या तयारीत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही. त्यासाठी आमच्यावर कोणतेही खटले दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. पालिकेने या प्रकल्पाचा हट्टाहास धरला तर आम्ही कोर्टात जाऊ, अशी भूमिका घेतली असल्याचे कचरा हटाव संघर्ष समितीने घेतली.
आंदोलनकर्त्यांना प्रकल्पाच्या जागेपासून १०० मीटर अंतरावरच अडवण्यात आले. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे पालिका आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी निषेध व्यक्त करीत आपली मनोगत व्यक्त केली. 

Web Title: The struggle for the removal of garbage project against the Ramtekdi project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.