घराचा दरवाजा बंद केल्याने केले चाकूने वार; दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 06:41 PM2018-02-26T18:41:05+5:302018-02-26T18:41:05+5:30

घराचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका ज्येष्ठाने युवकाला चाकूने भोसकल्याची घटना दांडेकर पुलावर घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.

stroke by Knife due to closing the door of the house; Dattawadi police arrests accused | घराचा दरवाजा बंद केल्याने केले चाकूने वार; दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला केली अटक

घराचा दरवाजा बंद केल्याने केले चाकूने वार; दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला केली अटक

Next
ठळक मुद्देघराचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून ज्येष्ठाने युवकाला भोसकले२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली घटना

पुणे : घराचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका ज्येष्ठाने युवकाला चाकूने भोसकल्याची घटना दांडेकर पुलावर घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. 
अरुण पर्वतराव पायगुडे (वय ६५, का. दांडेकर पुल) याला कोठडी सुनावली आहे. आशा बाळासाहेब सूर्यवंशी (वय ४२, रा. दांडेकर पूल) यांनी फिर्याद दिली आहे. गणेश ओबळे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. पायगुडे आणि सूयर्वंशी हे समोरासमोर राहतात. सूर्यवंशी या घरासमोर कपडे धुवत होत्या. पायगुडे हे घरात उघड झोपल्याने सूर्यवंशी यांनी त्यांच्या घराचा दरवाजा ओढून घेतला. त्याचा राग आल्याने पायगुडे याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी सूर्यवंशी यांचा भाचा ओबळे तेथे आला. त्या नंतर पायगुडे याने तुम्हा दोघांना जिवंत सोडत नाही असे म्हणत ओबळेच्या पोटात चाकू खुपसला. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. 
आरोपीचा गुन्हा करण्यामागे काय हेतू होता, आरोपीचे रक्ताचे नमुने घ्यायचे असल्याने त्यास कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती.

Web Title: stroke by Knife due to closing the door of the house; Dattawadi police arrests accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे