छेडछाडीस विरोधामुळे महिलेवर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 02:35 AM2018-11-03T02:35:58+5:302018-11-03T02:36:33+5:30

विनयभंग करणाऱ्यास विरोध केल्यामुळे एकाने महिलेवर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Striking a woman with a knife to protest | छेडछाडीस विरोधामुळे महिलेवर चाकूने वार

छेडछाडीस विरोधामुळे महिलेवर चाकूने वार

Next

पुणे : विनयभंग करणाऱ्यास विरोध केल्यामुळे एकाने महिलेवर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीतील महाराष्ट्र मेडिकल समोरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी वारजे येथे राहणाºया एका ३३ वर्षांच्या महिलेने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार हल्ला करणारा हुसेन खान (रा. सय्यदनगर, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला आणि खान हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गेल्या एक वर्षापासून हुसेन त्यांना त्रास देत आहे. ही महिला गुरुवारी दुपारी डहाणूकर कॉलनीतील रस्त्यावरून पायी जात असताना हुसेन खान हा पाठीमागून आला व त्याने या महिलेला मागून पकडले. त्यांनी विरोध करून सुटका करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने चाकू काढला व त्यांच्या हातावर वार करून जखमी केले. फिर्यादी यांनी आरडाओरडा करेपर्यंत आरोपी पळून गेला होता. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अलंकार पोलीस करीत आहेत.

Web Title: Striking a woman with a knife to protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.