राज्य पत्रकार संघाला विजेतेपद

By admin | Published: June 10, 2017 02:05 AM2017-06-10T02:05:56+5:302017-06-10T02:05:56+5:30

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व आदिनाथ क्रिकेट क्लब भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत राज्य

State Journalist Association wins title | राज्य पत्रकार संघाला विजेतेपद

राज्य पत्रकार संघाला विजेतेपद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व आदिनाथ क्रिकेट क्लब भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत राज्य मराठी पत्रकार संघाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संघाचा आठ गडी राखून पराभव करीत विजेतेपद पटकविले. तृतीय क्रमांक पोलीस संघाने पटकाविला.
नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांच्या हस्ते झाले. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, विठ्ठल कुबडे, मधुसुदन घुगे, बाळासाहेब अंतरकर, संदीप मांडवी उपस्थित होते.
अंतिम सामन्यात महपालिकेचे कर्णधार सुनील रेणुसे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. निर्धारित ८ षटकांत ६६ धावा केल्या. महापालिकेकडून राहुल चावारियाने १९, महेश कुडळेने १८ तर सचिन लोणेने १० धावा केल्या. पत्रकार संघाकडून सचिन शिंदेने १७ धावांत २ गडी, पराग कुंकुलोळने १४ धावांत १ गडी बाद केला.
६७ धावांचा पाठलाग करताना राज्य पत्रकार संघाकडून सलामीचे फलंदाज विजय जगदाळे व सागर बाबर यांनी सुरेख फटकेबाजी केली. जगदाळेने १७, बाबरने २२ आणि आशुतोष सिंगने नाबाद १३ धावा करीत संघास विजेतेपद पटकावून दिले. संजय माने, नितीन शिंदे यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. पालिकेच्या संघाकडून सुनील रेनुसेने २२ धावांत १ गडी, राहुल चावारियाने १२ धावांत १ गडी बाद केला. स्पर्धेत तृतीय क्रमांक पोलीस संघाने पटकाविला.

Web Title: State Journalist Association wins title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.