पुणे: आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 08:03 PM2017-07-28T20:03:00+5:302017-07-28T20:06:05+5:30

हिंजवडी व वाकड आयटी पार्क परिसरात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत.

Special committee for IT worker women security | पुणे: आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती

पुणे: आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती

Next
ठळक मुद्देआयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना सुचविण्यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समितीशिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. वाकड, खराडी आणि हिंजवडीसह ज्या भागात आयटी कंपन्या आहेत, त्या कंपन्यांकडून एक हजारापेक्षा अधिक कर्मचारी महिलांची यादी पोलिसांना मिळाली आहे.

पिंपरी, दि. 28 -  हिंजवडी व वाकड आयटी पार्क परिसरात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना सुचविण्यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दर महिन्याला ही समिती राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी हिंजवडी आयटीपार्क येथील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणा-या 33 वर्षीय युवतीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ती तरुणी रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला होता. 

रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अभिनव उपक्रम हाती घेतला होता. संगणक अभियंता अंतरा दास आणि रसिला राजू यांच्यासारख्यांच्या हत्या घडू नयेत याकरिता ‘बडी कॉप’ (मित्र पोलीस) ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 

महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचे ‘बडी कॉप’ 

हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीमध्ये रसिला राजू हिचा खून झाला होता. आयटी क्षेत्रातील महिलांंना रात्री-अपरात्री कामावर जावे लागते. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात विचार करीत असताना नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. वॉल्क विथ सीपी हा उपक्रम हिंजवडीमध्ये राबवण्यात आला. त्या वेळी बडी कॉपची संकल्पना समोर आली. चार पोलीस ठाण्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी 80 पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्या महिलेला रात्री उशिरा कामावरून घरी जात असताना असुरक्षित वाटेल तिला हा ‘बडी कॉप’ मदत करेल. 

वाकड, खराडी आणि हिंजवडीसह ज्या भागात आयटी कंपन्या आहेत, त्या कंपन्यांकडून एक हजारापेक्षा अधिक कर्मचारी महिलांची यादी पोलिसांना मिळाली आहे. पोलीस आता त्यांना ईमेल तसेच मोबाईलवरून संपर्क साधून त्यांचे व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप बनवणार आहेत. ४० महिलांमागे एक पोलीस (बडी कॉप) नेमण्यात आलेला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल क्रमांक सर्व महिलांना देण्यात येणार असून, रात्री घरी जाताना असुरक्षित वाटले तर त्या महिलेने संबंधित बडी कॉपला संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्यांच्याकडून केली जाईल. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत. यापूर्वीही पोलिसांनी संकेतस्थळावरील माय कम्प्लेंट या आॅप्शनमधून तक्रार करण्याचे आवाहन केलेले आहे. महिला हेल्पलाईनद्वारेही तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. हिंजवडीत झालेल्या खुनाच्या घटनेनंतर याभागात दामिनी पथकाची आणखी तीन नवी पथके नेमण्यात आली आहेत. 

 

 

 

Web Title: Special committee for IT worker women security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.