‘चेटीचंड’ महोत्सवातून सिंधु संस्कृतीचे दर्शन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 08:22 PM2018-03-22T20:22:06+5:302018-03-22T20:22:06+5:30

अल्पबचत भवनमध्ये झालेल्या या महोत्सवात संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्टयपूर्ण ठरला.

sindhu culture present from 'Chetichand' festival | ‘चेटीचंड’ महोत्सवातून सिंधु संस्कृतीचे दर्शन  

‘चेटीचंड’ महोत्सवातून सिंधु संस्कृतीचे दर्शन  

Next
ठळक मुद्दे झुलेलाल यांचे विधिवत पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रम व भजन आयोजन

पुणे : गायक जतीन उदासी यांचे बहारदार गायन... सिंधी गीतांच्या ऐकाव्याशा वाटणा-या चाली... कलात्मक नृत्य...चाट-सामोसा-गोड भात...डोक्यावर लाल टोपी आणि झुलेलाल यांचे अखंड भजन अशा वातावरणाच्या माध्यमातून नववर्षाच्या सुरुवातीला सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले.
सिंधी समाजाच्या नववर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०६८ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अल्पबचत भवनमध्ये झालेल्या या महोत्सवात संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्टयपूर्ण ठरला. कार्यक्रमासाठी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया उपस्थित होत्या. यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल ओय फौंडेशनच्या संस्थापक सिमरन जेठवानी, क्रिप्स फौंडेशनचे मनोहर फेरवानी, ईश्वर कृपलानी यांचा सन्मान करण्यात आला. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी, सचिव सचिन तलरेजा, माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, विनोद रोहानी यांच्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ४००० पेक्षा अधिक सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी झाले होते.
दीपक वाधवानी म्हणाले, दोन दिवसांच्या चेटीचंड महोत्सवानिमित्त पहिल्या दिवशी भगवान साई झुलेलाल यांची भव्य मिरवणूक व रथयात्रा काढली जाते. दुस-या दिवशी झुलेलाल यांचे विधिवत पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रम व भजन होते. यंदा जनरेशन नेक्स्ट डान्स अ‍ॅकडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण आणि जतिन उदासी व सहका-यांचा लाईव्ह कॉन्सर्ट झाला. 

Web Title: sindhu culture present from 'Chetichand' festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.