श्री काळभैरवनाथ उत्सवाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:50 PM2019-02-17T23:50:26+5:302019-02-17T23:50:37+5:30

उद्यापासून गावात यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Shri Kalbhairnath festival is ready for the city | श्री काळभैरवनाथ उत्सवाची जय्यत तयारी

श्री काळभैरवनाथ उत्सवाची जय्यत तयारी

Next

यवत : येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून त्यानिमित्त गावात विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांनी केले आहे. यात्रेनिमित्त श्री काळभैरवनाथ मंदिर व श्री महालक्ष्मीमाता मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मंगळवारी (दि. १९) गावातील श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मीमाता उत्सवाची सुरुवात होणार आहे. यानिमित्त पहाटे नाथांची महापूजा, सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत देवाला पाणी घालणे, ९ ते ११ वाजेपर्यंत देवाचा पोशाख, ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दंडवत व नैवेद्य, सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत काट्यांची सवाद्य मिरवणूक, रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत देवांची पालखी छबिना सवाद्य मिरवणूक काढली जाणार आहे. रात्री भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. बुधवारी (दि. २०) सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत भिका भीमा सांगवीकर यांच्या लोकनाट्य तमाशा हजेऱ्यांचा कार्यक्रम होणार असून दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा केला जाणार आहे. गावातील आखाड्याचे मैदान नव्याने बांधण्यात आले असून यामुळे यंदापासून कुस्त्यामधील रंगत चांगल्या पद्धतीने पाहण्याची संधी कुस्तीशौकिनांना मिळणार आहे. यात्रा-उत्सवात सालाबादप्रमाणे ढोल लेझीम, इतर खेळ, तसेच भजनी मंडळे, छडीपट्टे, टिपºयांचा खेळ, इतर कलाकार, पैलवान मंडळी या सर्व लोकांनी इष्टमित्रांसह खेळ घेऊन उत्सवात येण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ, श्री काळभैरवनाथ व इतर देवस्थान ट्रस्ट, यवत यांच्यावतीने करण्यात आले आहे.
 

Web Title: Shri Kalbhairnath festival is ready for the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे