सहकानगरमध्ये चौकीत पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 09:35 PM2018-07-18T21:35:49+5:302018-07-18T21:37:05+5:30

मुलांमधील भांडणे झाल्यानंतर त्यातील मुलाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तिघांनी अरेरावी करत शिवीगाळ केली.

shouting, sloganeering to police in police station at Sahkangar | सहकानगरमध्ये चौकीत पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की 

सहकानगरमध्ये चौकीत पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की 

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी एकाला अटक व दोन महिलांवर गुन्हा दाखल

पुणे : मुलांमधील भांडणे झाल्यानंतर त्यातील मुलाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तिघांनी अरेरावी करत शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस चौकीत येऊन त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार सहकारनगर पोलीस चौकीत मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घडला़ पोलिसांनी त्यांच्यातील एकाला अटक केली आहे़. 
संतोष रामदास कुचेकर (वय ४०, रा़ तळजाई वसाहत, पद्मावती) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी पोलीस नाईक प्रकाश मरजगे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर येथे काही मुलांमध्ये भांडण झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ भांडण करणाऱ्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिस नाईक मरजगे आणि पोलिस शिपाई मोरे हे दोघे मार्शल दुपारी साडेतीन वाजता माने गिरणीच्या मागे असलेल्या रमेश किराणा दुकानाजवळ गेले़. त्यावेळी तेथे दोन महिलांनी त्यांना अपशब्द  वापरून शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही मार्शल पोलीस चौकीत गेल्यानंतर तेथे संतोष कुचेकर व या महिला पोलीस चौकीत आल्या़. त्यांनी शिवीगाळ करत पोलिसांना धुक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी संतोष कुचेकर याला अटक केली आहे. तर दोन महिलांवर गुन्हा दाखल केला. 

Web Title: shouting, sloganeering to police in police station at Sahkangar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.