धक्कादायक ! महाराष्ट्रात ४ कोटी जनता व्यसनी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 07:14 PM2018-03-23T19:14:14+5:302018-03-23T19:22:14+5:30

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि पप्रगत राज्य मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात चार कोटी नागरिक व्यसनाच्या विळख्यात अडकल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे. ही आकडेवारी धक्कादायक तर आहेच पण सामाजिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारीही आहे.

Shocking ! 4 million people addicted in Maharashtra | धक्कादायक ! महाराष्ट्रात ४ कोटी जनता व्यसनी ?

धक्कादायक ! महाराष्ट्रात ४ कोटी जनता व्यसनी ?

Next
ठळक मुद्देव्यसनामुळे प्रतिवर्ष ४५ हजार कुटुंब उध्वस्त सरासरी कुटुंबातील एक व्यक्ती व्यसनाधीन

पुणे : देशातील प्रगतीपथावर चाललेल्या राज्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील एक तृतीयांश म्हणजे सुमारे चार कोटी जनता व्यसनी असल्याचे निरीक्षण व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने नोंदवले आहे.दरवर्षी साडेतीन लाखांपेक्षा अधिक नागरिक दारू पिण्यामुळे मृत्यूला कवटाळत असून तब्बल ४५ हजार कुटुंब उध्वस्त होत आहेत. या संस्थेने केलेल्या ९८ गावांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार हे धक्कादायक निष्कर्ष  समोर आले आहे.या सर्वेक्षणात दारू व इतर उपलब्ध विविध व्यसनांच्या आधारावर प्रश्नावली तयार करण्यात आली होती. संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करता येईल अशा गावांचा अभ्यास करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. या सर्वेक्षणात दारू या व्यसनाच्या अनुषंगाने सुमारे १९ प्रश्न असलेली प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात लिहिण्यात लक्षात आलेले निष्कर्ष हे भविष्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे दिसून आले आहेत. व्यसन करण्यासाठी आर्थिक, सामाजिक परिस्थिती आणि मानसिक अवस्था जबाबदार असते. त्यामुळे परिस्थिती बदलण्याची सर्वाधिक गरज असल्याचे निदर्शनास आले आहे. या निरीक्षणात संपूर्ण राज्यात दारू, तंबाखू, गुटखा, तपकीर, खर्रा, सिगारेट, अफू, गांजा, ड्रग्ज, ताडी, माडी आदी वैध आणि अवैध प्रकारची व्यसने गल्लीबोळातही उपलब्ध आहेत. राज्याच्या १२कोटी लोकसंख्येपैकी ४ कोटी यक्ती कोणत्यातरी व्यसनात अडकलेले आहेत. प्रत्येक कुटुंबात एक व्यक्ती व्यसनाधीन आहे असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.तसेच ६०%नागरिक दारूमुळे भांडणे होत असल्याचे मान्य करत असल्याचेही मान्य केले असे ठळक मुद्दे नागरिकांनी मांडले आहेत.  व्यसनमुक्तीसाठी केवळ काम करणे आवश्यक नसून त्यामागे असणारी मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. याबाबत मागील दोन अधिवेशनांच्या काळात आंदोलने करण्यात आली असून राज्याच्या हिरकवर्षानिमित्त व्यसनमुक्ततेची संकल्पना राबवावी अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे करण्यात आली असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. 

Web Title: Shocking ! 4 million people addicted in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.