अटल सेतूवरुन शिवनेरी धावणार; स्वारगेट ते दादर आणि पुणे स्टेशन-मंत्रालय बससेवा सुरु होणार

By अजित घस्ते | Published: February 19, 2024 07:32 PM2024-02-19T19:32:32+5:302024-02-19T19:32:58+5:30

प्रवासाचा सुमारे एक तास वेळ वाचणार

Shivneri will run from Atal Setu Swargate to Dadar and Pune Station Ministry bus services will be started | अटल सेतूवरुन शिवनेरी धावणार; स्वारगेट ते दादर आणि पुणे स्टेशन-मंत्रालय बससेवा सुरु होणार

अटल सेतूवरुन शिवनेरी धावणार; स्वारगेट ते दादर आणि पुणे स्टेशन-मंत्रालय बससेवा सुरु होणार

पुणे : देशातील सर्वात मोठ्या शिवडी ते न्हावा शेवा या सागरी मार्गा नुकतेच वाहतुकीसाठी खुला केला. हा मार्ग पुढे मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरुन शिवनेरीच्या मोजक्या फेर्‍या अटल सागरी सेतूवरून चालविण्यासाठी परवानगी मिळाली आहे. एसटीची शिवनेरी बस प्रायोगिक तत्वावर मंगळवार (दि. २०) पासूनच स्वारगेट-दादर आणि पुणे स्टेशन-मंत्रालय दरम्यान  शिवनेरी अटल सेतूवरुन धावणार आहे. त्यामुळे प्रवासाचा सुमारे एक तास वेळ वाचणार आहे.

पुणे स्टेशन-मंत्रालय (स. ६.३०) आणि स्वारगेट–दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर बसेसच्या आरक्षणांचे ऑन लाईन तिकिट रा. प. महामंडळाच्या www.msrtc.gov.in व www.npublic.msrtcors.com या वेबसाईट वरुन व मोबाईल अॅपवरुन देखिल तिकीट काढण्याची सोय आहे. तरी प्रवाशांनी सुरक्षित सेवेचा लाभ घेवुन एस. टी. ने प्रवास करावा व खाजगी वाहतुकीचा प्रवास टाळावा असे आवाहन पुणे विभागाचे विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी केले आहे.

Web Title: Shivneri will run from Atal Setu Swargate to Dadar and Pune Station Ministry bus services will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.