अपयशावरील लक्ष विचलित करण्यासाठी 43 वर्षांनंतर अाणीबाणी अाठवली: शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:57 PM2018-06-26T14:57:11+5:302018-06-26T14:59:08+5:30

गेल्या चार वर्षातील अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अाता 43 वर्षानंतर अाणीबाणी अाठवत अाहे असा टाेला शरद पवार यांनी अरुण जेटली यांना लगावला.

to shift focus from failure they remind emergency says sharad pawar | अपयशावरील लक्ष विचलित करण्यासाठी 43 वर्षांनंतर अाणीबाणी अाठवली: शरद पवार

अपयशावरील लक्ष विचलित करण्यासाठी 43 वर्षांनंतर अाणीबाणी अाठवली: शरद पवार

Next

पुणे : चार वर्षात अालेल्या अपयशावरील लक्ष विचलित करण्यसाठी 43 वर्षानंतर अाता अाणीबाणी अाठवत अाहे असा टाेला शरद पवार यांनी अरुण जेटली यांना लगावला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या अाणीबाणीची तुलना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी साेमवारी अॅडाॅल्फ हिटलरच्या राजवटीशी केली हाेती. त्यावर बाेलताना पवारांनी वरील टाेला लगावला.


    अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू अकॅडमीच्या वतीने शाहू महाराजांच्या जयंती समारंभाचे अायाेजन करण्यात अाले हाेते, त्यानंतर पवार पत्रकरांशी बाेलत हाेते. गेल्या चार वर्षात अालेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अाता 43 वर्षांनंतर अाणीबाणी अाठवत अाहे, वाजपेयींच्या पाच वर्षात अाणबाणीची कधी अाठवण अाली नव्हती असेही पवार यावेळी म्हणाले. 


   हिटलरलाही मागे टाकत इंदिराजींनी राज्यघटनेचा विकृत वापर करुन देशातील लाेकशाहीत घराणेशाहीची मुहूर्तमेढ राेवली असा अाराेप जेटली यांनी केला हाेता. अाणीबाणीच्या 43 व्या वर्षदिनानिमित्त जेटली फेसबुकवरील ब्लाॅगमधून तीन भागांत अापले विश्लेषण जेटली मांडत अाहेत. यापैकी दुसऱ्या भागात जेटली यांनी अाणीबाणीचा 19 महिन्यांचा कालखंड 1933 मधील नाझी जर्मनीमधील हिटलरशाही मिळताजुळता हाेता. हिटलर व इंदिरा गांधी या दाेघांनी अापापल्या देशांच्या राज्यघटनांचा वापर करुन लाेकशाही राज्यव्यवस्थेस हुकूमशाहीत परिवर्तित केले. फरक एवढाच की राज्यघटनेचा साेईस्कर वापर करुन हिटलरने एका व्यक्तीची हुकूमशाही राजवट राबविली याउलट इंदिरा गांधी यांनी भारतातील लाेकशाही व्यवस्थेला घराणेशाहीचे स्वरु दिले असे अापल्या ब्लाॅगमध्ये लिहिले अाहे. 

Web Title: to shift focus from failure they remind emergency says sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.