Pune: जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत गर्भवतीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 11:59 AM2024-01-26T11:59:01+5:302024-01-26T11:59:32+5:30

याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे...

Sexual assault on pregnant woman with threat of death; A 19-year-old youth was arrested | Pune: जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत गर्भवतीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक

Pune: जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत गर्भवतीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक

पुणे : गरोदर महिलेला जबरदस्तीने दुचाकीवरून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार २२ ते २४ जानेवारी दरम्यान, हडपसर व श्रीगोंदा येथील एका हॉटेलमध्ये घडला आहे.

याबाबत हडपसर येथील २३ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. २४) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून यश संतोष केकान (१९, रा. काळेपडळ, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात. फिर्यादी यांचे लग्न झाले असून त्या गरोदर आहेत. आरोपीने फिर्यादी महिलेला स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी लग्न करण्याच्या उद्देशाने महिलेला जबरदस्तीने श्रीगोंदा येथे घेऊन गेला. फिर्यादी गरोदर असल्याचे माहीत असतानाही आरोपीने त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे करत आहेत.

Web Title: Sexual assault on pregnant woman with threat of death; A 19-year-old youth was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.