मोबाईलवर मिळणार सात-बारा : चंद्रकांत दळवी

By admin | Published: June 3, 2017 01:41 AM2017-06-03T01:41:14+5:302017-06-03T01:41:14+5:30

शेतकऱ्यांचा मालकी हक्काचा ७/१२ उताऱ्याच्या कामासाठी शेतकऱ्यांना जलद सेवा देण्यासाठी राज्य सरकारने १०० वर्षांचे रेकॉर्ड

Seven bars will be available on mobile: Chandrakant Dalvi | मोबाईलवर मिळणार सात-बारा : चंद्रकांत दळवी

मोबाईलवर मिळणार सात-बारा : चंद्रकांत दळवी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी हाजी : शेतकऱ्यांचा मालकी हक्काचा ७/१२ उताऱ्याच्या कामासाठी शेतकऱ्यांना जलद सेवा देण्यासाठी राज्य सरकारने १०० वर्षांचे रेकॉर्ड जतन करून ठेवले असून, मोबाईलवरही आता ७/१२ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.
म्हसे (ता. शिरूर) येथे संगणकीकृत ७/१२ उताऱ्याचा चावडीवाचन कार्यक्रम झाला. त्या वेळेस ते बोलत होते. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, प्रांताधिकारी भाऊ गलांडे, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, तहसीलदार रणजित भोसले, राजेंद्र पोळ, मंडल अधिकारी आर. जे. वाल्मीकी, तलाठी प्रमोद के. लोखंडे, नायब तहसीलदार एस. शेख, प्रकाश वायशे, सोनभाऊ मुसळे, पांडुरंग खाडे, काळुराम पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौरभ राव म्हणाले, की संगणकीकृत ७/१२ बरोबरच शेतकऱ्यांनी पाणी अडवा-पाणी जिरवण्याची गरज आहे. जिल्ह्यात ४५० गावांत टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

Web Title: Seven bars will be available on mobile: Chandrakant Dalvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.