टेम्पोच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक महिला ठार; चाकण पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 06:08 PM2018-01-08T18:08:58+5:302018-01-08T18:11:05+5:30

भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Senior woman killed in tempo dashing; Complaint filed in Chakan police | टेम्पोच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक महिला ठार; चाकण पोलिसांत गुन्हा दाखल

टेम्पोच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक महिला ठार; चाकण पोलिसांत गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देपुणे-नाशिक महामार्गावर चाकण मार्केट यार्ड कमानीच्या जवळ झाला अपघातटेम्पोचालक नीलेश बिलोरेवर दाखल करण्यात आला गुन्हा

चाकण : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : सरूबाई पितांबर पाटील (वय ७५, रा. चाकण, मूळ गाव निषाने, ता. एरंडोल, जि. जळगाव) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण मार्केट यार्ड कमानीच्या जवळ हा अपघात झाला. ही महिला रस्ता ओलांडत असताना टेम्पोने (एमएच ४० - ७३६०) जोरदार धडक दिली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पोचालक नीलेश बिलोरे (वय २९, रा. कळमदरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Senior woman killed in tempo dashing; Complaint filed in Chakan police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे