पाणी - चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 07:12 PM2018-08-30T19:12:32+5:302018-08-30T20:40:08+5:30

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस पडला असुन विशेषत: कमी पाऊसाचा जिरायती भागाला सर्वाधिक फटका बसला आहे.

Senior leader sharad pawar reviewed about water problem | पाणी - चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावा : शरद पवार

पाणी - चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावा : शरद पवार

Next
ठळक मुद्देतालुक्याच्या पाणी टंचाईचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतला आढावा सध्या तालुक्यात कमी पावसामुळे दुष्काळ पडण्याची दाट शक्यता

सांगवी : बारामती तालुक्यातील तीन गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरसाठी जिरायती भागातील गावांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. तालुक्याच्या पाणी टंचाईचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आढावा घेतला आहे. जिरायती भागातील पाणी प्रश्न टँकरच्या माध्यमातून मार्गी लावा. हिरवा चारा उपलब्ध तातडीने उपलब्ध करा, अशा सुचना त्यांनी बारामती पंचायत समितीला दिल्या आहेत. 
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस पडला असुन विशेषत: कमी पाऊसाचा जिरायती भागाला सर्वाधिक फटका बसला आहे.पावसाने दडी मारल्याने बारामती तालुक्यात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हवामान खात्याने जरी पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी बारामती तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. मुसळधार पावसाची आजही शेतकºयांसह पाण्याचा तुटवडा जाणवनार्या जिरायत भागातील  नागरिकांना प्रतीक्षा आहे.बारामती  तालुक्यातील पाणी टंचाईबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सभापती संजय भोसले यांच्या कडुन बारामतीत झालेल्या एका बैठकी  दरम्यान  आढावा घेतला. याबाबत अधिक माहिती देताना सभापती संजय भोसले म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही. विशेषत: जिरायती भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. या भागात पुरेसा पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणारा असून, प्राण्यांची  हिरव्या चा-याचा प्रश्न गंभीर होऊ लागला  आहे. सध्या तालुक्यातील देऊळगाव रसाळ, उंडवडी, नारोळी या तिन गावांना पंचायत समितीने टँकरने पिण्याचे पाणी दिले जात आहेत. तर पानसरेवाडी व दंडवाडी या गावांसाठी टँकर सुरु करावेत, यासाठी प्रस्ताव दिले आहेत.
........................
सध्या तालुक्यात कमी पावसामुळे दुष्काळ पडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे काही गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी पंचायत समिती तत्पर आहे. ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे अशा गावाला पाणी पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहू.
- संजय भोसले 
सभापती पंचायत समिती बारामती
——————————————————  

Web Title: Senior leader sharad pawar reviewed about water problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.