लातूर येथे ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:35 PM2018-02-06T12:35:32+5:302018-02-06T12:37:34+5:30

धनगर साहित्य परिषदेच्या  वतीने  यंदा लातूर येथे नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

The second tribal Dhanagar Sahitya Sammelan will be held in Latur from 9th to 11th February | लातूर येथे ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन

लातूर येथे ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन

Next
ठळक मुद्देअध्यक्षस्थानी असणार मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे समारोप सत्र अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक डॉ. कांचा इलय्याउ राहणार उपस्थित

पुणे : धनगर साहित्य परिषदेच्या  वतीने  यंदा लातूर येथे नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे अध्यक्षस्थानी असणार आहेत.  जेष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग शेंडगे यांनी दिली. 
अण्णाराव पाटील हे  संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत. समारोप सत्राचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक  डॉ. कांचा इलय्याउ उपस्थित राहणार आहेत. जेष्ठ साहित्यिक  संजय सोनवणी हे या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. संमेलनात  साहित्य संस्कृती, माध्यमांची भुमिका, महिलांचे संस्कृतीतील योगदान, समाजासमोरील ज्वलंत प्रश्न अशा अनेक विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. 

पुरस्कारांचे वितरण 
ना. धों. महानोर, कांचा इलय्या, महेश कोठारे आणि संजय सोनवणी जीवनगौरव व कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असेही शेंडगे यांनी सांगितले. 

Web Title: The second tribal Dhanagar Sahitya Sammelan will be held in Latur from 9th to 11th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.