अकरावीच्या दुसऱ्या फेरीत चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:33 AM2018-07-20T00:33:42+5:302018-07-20T00:34:57+5:30

शहरातील काही ठराविक महाविद्यालयांच्या पहिल्या व दुस-या फेरीच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड गुणाचा फरक असल्याने या फेरीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसते.

In the second round of the eleventh round | अकरावीच्या दुसऱ्या फेरीत चढाओढ

अकरावीच्या दुसऱ्या फेरीत चढाओढ

Next

पुणे : इयत्ता अकरावीच्या दुस-या प्रवेश फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. शहरातील काही ठराविक महाविद्यालयांच्या पहिल्या व दुस-या फेरीच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड गुणाचा फरक असल्याने या फेरीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसते. दुस-या फेरीत सुमारे २५ हजार ६०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीची आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.
या प्रक्रियेत सुमारे ७६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार १२२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला. पहिल्या पसंती क्रमानुसार निवड झालेल्या, परंतु प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज ब्लॉक करण्यात आले. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना दुसºया फेरीत संधी देण्यात आली. या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.
या यादीमध्ये एकूण २५ हजार ६७६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना दि. १९ ते २१ जुलै या कालावधीत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येईल.
शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांचे कटआॅफ गुण दुसºया फेरीतही नव्वदीच्या पुढेच राहिले आहेत. पहिल्या फेरीच्या तुलनेत या फेरीतील गुणांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे पहिल्या फेरीचे अनुदानित तुकडीचे खुल्या गटातील कटआॅफ गुण ९५ टक्के होते. दुसºया फेरीत त्यामध्ये केवळ ०.६० टक्क्याचा फरक पडला आहे.
आपटे प्रशालेचे विज्ञान शाखेचे कटआॅफ पहिल्या फेरीत ९७.६०, तर दुसºया फेरीत ९६.२० टक्के राहिले. सप महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड टक्क्याचा फरक पडला आहे. हीच स्थिती फर्ग्युसन अन्य काही प्रमुख महाविद्यालयांची होती.

दुसरी संधी : सहज प्रवेश मिळणार
शहरातील प्रमुख महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून पसंती दिली जाते. त्यामुळे चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून पहिल्या फेरीत संधी गेल्याने दुसºया फेरीतही या महाविद्यालयांना पसंती दिली आहे. प्रामुख्याने पहिल्या फेरीतच या महाविद्यालयांच्या बहुतेक जागा भरल्या जातात. केवळ काही जागा रिक्त असल्याने दुसºया फेरीचे कटआॅफ वाढते. तिसºया फेरीतही त्यामध्ये फारसा फरक पडणार नाही. इतर महाविद्यालयांच्या कटआॅफमध्ये मात्र मोठा फरक पडत जातो. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: In the second round of the eleventh round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.