पत्र्याच्या शेडमध्येच भरतात शाळा

By admin | Published: December 18, 2014 04:31 AM2014-12-18T04:31:43+5:302014-12-18T04:31:43+5:30

विद्येचे माहेरघर, ‘हायटेक शहर’ अशी ओळख असलेल्या पुणे शहरात आजही अनेक शाळा चक्क पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहेत

The school fills in the sheds of the paper | पत्र्याच्या शेडमध्येच भरतात शाळा

पत्र्याच्या शेडमध्येच भरतात शाळा

Next

राहुल शिंदे, पुणे
विद्येचे माहेरघर, ‘हायटेक शहर’ अशी ओळख असलेल्या पुणे शहरात आजही अनेक शाळा चक्क पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहेत. त्यात केवळ पुणे महानगरपालिकेच्या शाळांचा नाही, तर खासगी इंग्रजी माध्यामाच्या केजीपासून ते इयत्ता दहावीपर्यंतच्या शाळांचा समावेश आहे. परंतु, यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) अंमलबजावणीला हरताळ फासला जात असल्याने, या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींप्रमाणे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शैक्षणिक साहित्याबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या शाळेत शिक्षण मिळायला हवे; परंतु पुणे शहरातील येरवडा, वडगावशेरी, एरंडवणा आणि तळजाई या भागांतील शाळा आजही पत्र्याच्या शेडमध्ये सुरू आहेत. एक ई-लर्निंग शाळा सुरू करून, आपण आधुनिक युगाबरोबर चाललो आहोत, असे पालिकेतर्फे अभिमानाने सांगितले जाते. परंतु, पालिकेच्या अनेक शाळांची अवस्था भीषण आहे. मात्र, या शाळांकडे लक्ष देण्यास पालिका प्रशासनाला वेळ नसल्याचे दिसून येत आहे.
वडगावशेरी येथील ‘नॅशनल चिल्डर्न्स अ‍ॅकॅडमी’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे वर्ग सुमारे सात महिन्यांपासून दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू आहेत, तर धनकवडी भागातील तळजाई रस्त्यावरील मनपा शाळा क्रमांक-९१ मुलींचे प्राथमिक विद्यालय पूर्णपणे पत्राच्या शेडमध्ये भरत आहे. एवढेच नाही, तर शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एरंडवणा परिसरातील नळस्टॉप जवळील ‘कै. अनुसयाबाई खिलारे प्राथमिक विद्यालय’ या पालिकेच्या शाळेतील काही वर्गसुद्धा पत्र्याच्या शेडमध्येच चालविले जात आहेत. मात्र, सध्या या शाळेजवळ एका नवीन इमारतीचे काम सुरू आहे.
येरवडा परिसरातील हौसिंग बोर्ड येथील ‘समता बालक मंदिर’ या शाळेतील विद्यार्थ्यांनी एका पत्र्याच्या शेडमध्येच शिक्षण घेतले. परंतु, सुदैवाने गेल्या काही महिन्यांपासून पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेले हे वर्ग आता बंद केले आहेत.

Web Title: The school fills in the sheds of the paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.