थेट सरपंचांमुळे फेरबदल थांबणार! अनेकांची स्वप्ने भंगणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:43 AM2018-05-11T02:43:11+5:302018-05-11T02:43:11+5:30

राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराला आता थेट जनतेतून निवडून यावे लागणार असल्याने जुन्या पद्धतीने सदस्या मधून सरपंच निवडीची प्रक्रिया कालबाह्ण होत असल्याने अनेक गाव पुढाऱ्यांचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगणार आहे.

Sarpancha Election will stop | थेट सरपंचांमुळे फेरबदल थांबणार! अनेकांची स्वप्ने भंगणार  

थेट सरपंचांमुळे फेरबदल थांबणार! अनेकांची स्वप्ने भंगणार  

Next

कुरकुंभ  - राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराला आता थेट जनतेतून निवडून यावे लागणार असल्याने जुन्या पद्धतीने सदस्या मधून सरपंच निवडीची प्रक्रिया कालबाह्ण होत असल्याने अनेक गाव पुढाऱ्यांचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगणार आहे. त्यामुळे सरपंच होण्यासाठी राजकीय फेरबदलाला जवळपास लगाम लागणार आहे. परिणामी, अल्पावधीत राजीनामा देवून दुसºया उमेदवाराला सरपंचपदाची संधी उपलब्ध होणार नाही. या नवीन नियमामुळे कुरघोडीच्या राजकारणाला बºयाच प्रमाणात पायबंद घातला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील या पद्धती बाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
दौंड तालुक्यातील जवळपास दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. त्यातच यामध्ये हा नवीन नियम लागू झाल्याने सरपंच पदाच्या शर्यतीत अतिशय कडव्या झुंजी पहावयास मिळणार आहेत. प्रत्येक गटातून सक्षम उमेदवार देण्याकडे कल असणार असून त्यामुळे प्रत्येक गावात जोरदार मोचेर्बांधणी सुरु असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सरपंच पदासाठी विविध समाजाचे आरक्षण पडले आहेत. त्यातून देखील होईल शक्य तितके लोकप्रियतेत खरे उतरणारे उमेदवार निवडण्याचे आवाहन प्रत्येक गट प्रमुखापुढे असणार आहे. तर जनतेसमोर देखील उचीत व कार्यक्षम सरपंच निवडण्याचे किचकट आवाहन असणार आहे.
आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका देखील समोर असल्याने तालुकास्तरीय नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कारण ग्रामपंचायत निवडणुका विधानसभेवर बराच प्रभाव पाडू शकणार आहेत. त्यातच सरपंच आपल्या गटातील असला म्हणजे त्या गावात मतदानाला लीड मिळणे सोपे जाणार असल्याचे राजकीय गणितं आखले जात आहेत. याचाच परिणाम म्हणून स्थानिक गावपुढारी व तालुकास्तरीय नेत्यांची बैठका होत असल्याचे निदर्शनास येत आहे .

मतदारांच्या चाचपण्या सुरू

- सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक जाती धर्माच्या प्रतिनिधींना संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न प्रत्येक गटातून सुरु आहे. त्यामुळे बºयाच वेळेस एकाच घरातील किंवा भावकीतील उमेदवार आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे मतदान करणार कोणाला हा देखील प्रश्न मतदारांपुढे असणार आहे. मागील दहा दिवसांपासून बैठकांच्या माध्यमातून मतदारांच्या चाचपण्या सुरु आहेत. अनेक व्यवसायांना सुगीचे दिवस देखील आल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. एकमेकांच्या बैठकीतील मुद्दे कळण्यासाठी आपल्या विचारांची माणसं विरोधी गटात मिसळण्याचा प्रयत्न सुरु आहेत. त्यातूनच गावाच्या मुख्य चौकात सकाळ संध्याकाळ विविध चर्चांना उधान आले आहे.

- जनतेतून सरपंच निवडल्याने सरपंच होण्यासाठी सदस्यांची लागणारी मदत आता आवश्यक नाही त्यामुळे बºयाच प्रमाणात आर्थिक घोडेबाजार बंद झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यामुळे काही जणांच्या राजकीय पोळ्या भाजण्याचे दुकान बंद झाले असल्याने ते नाराज आहेत अशी देखील चर्चा होत आहे. त्यामुळे येणाºया काळात या निवडणुकीच्या माध्यमातून काय चित्र निर्माण होते हे पाहणे निश्चितच उत्साहाचे ठरणार आहे.

Web Title: Sarpancha Election will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.