सैनिकांसाठी पुणेकरांतर्फे २५ हजार राख्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:48 AM2017-07-31T04:48:28+5:302017-07-31T04:48:31+5:30

देशाच्या सीमेचे रक्षण करणाºया सैनिकांचे कोणाशीही रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. त्यामुळे सरहद्दीवरील अशा हजारो सैनिकांना

saainaikaansaathai-paunaekaraantaraphae-25-hajaara-raakhayaa-ravaanaa | सैनिकांसाठी पुणेकरांतर्फे २५ हजार राख्या रवाना

सैनिकांसाठी पुणेकरांतर्फे २५ हजार राख्या रवाना

Next

पुणे : देशाच्या सीमेचे रक्षण करणाºया सैनिकांचे कोणाशीही रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. त्यामुळे सरहद्दीवरील अशा हजारो सैनिकांना आपला भाऊ मानणाºया पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी २५ हजारहून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला.
भारतमाता की जय... च्या जयघोषात ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरामध्ये विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एकत्रित केलेल्या राख्यांचे पूजन मोठ्या उत्साहात झाले.
सैनिक मित्र परिवारातर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी आणि पारंपरिक वेशात आलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. या वेळी वीरमाता सुवर्णा गोडबोले, वीरपत्नी दीपाली मोरे, संगीता ठकार, कल्याणी सराफ, गंधाली पोटफोडे, माला रणधीर, विनया देसाई, स्वाती ओतारी, आनंद सराफ, राजू पाटसकर, संदीप ढवळे, अनिल पानसे, अ‍ॅड. बिपीन पाटोळे, कुमार रेणुसे आदी उपस्थित होते. सैनिकांसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे, पत्र व राख्या या वेळी पाठवण्यात आल्या.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘सैनिक हो तुमच्यासाठी... हे गाणे ऐकताच आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. परंतु पुण्यामध्ये या सैनिकांची आठवण ठेवत आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे. सैनिक देशवासीयांचे
रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावतात. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रेम व संवेदना प्रत्येक भारतीयाच्या
मनात असायला हवी. देशवासीयांनी त्यांच्यासोबत साजºया केलेल्या
अशा सणांमधून सैनिकांना बळ मिळणार आहे.’

Web Title: saainaikaansaathai-paunaekaraantaraphae-25-hajaara-raakhayaa-ravaanaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.