वाहतुकीचे नियम पाळतो तोच खरा पुणेकर, पोलिसांचे घोषवाक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:01 AM2019-02-04T03:01:56+5:302019-02-04T03:02:18+5:30

रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलीस शाखेतर्फे नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. उपक्रमांतर्गत मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळच्या सभागृहात कार्यक्रम झाला.

The rules of the traffic rules are the same as Punekar, the slogan of police | वाहतुकीचे नियम पाळतो तोच खरा पुणेकर, पोलिसांचे घोषवाक्य

वाहतुकीचे नियम पाळतो तोच खरा पुणेकर, पोलिसांचे घोषवाक्य

googlenewsNext

बिबवेवाडी - रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलीस शाखेतर्फे नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. उपक्रमांतर्गत मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळच्या सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी पोलीस, आॅर्थोपेडिक सर्जन व वाहतूक विभागातील तज्ज्ञ आदींना नवीन चित्रफिती दाखविण्यात आल्या. ‘वाहतुकीचे नियम पाळतो तोच खरा पुणेकर’ या घोषवाक्याची माहिती देण्यात आली.
शहरातील नागरिकांना पुणेकर असल्याचा अभिमान असतो, त्या भावनेचा वापर करून, जो वाहतुकीचे नियम पाळतो तोच खरा पुणेकर, असे घोषवाक्य बनवून त्याचा चित्रफितीत वापर केल्याचे वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
या वेळी रस्ता सुरक्षा विषयी समुपदेशन कार्यक्रमास
योगदान देणारे तज्ज्ञ, व्याख्याते, पोलीस कर्मचारी, आॅर्थोपेडिक सर्जन व वाहतूक विभागातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. दोन महिन्यांत वाहतूक शाखेने राबविलेल्या उपाय योजनांमुळे अपघातांच्या संख्येत घट झाल्याचा आलेख दाखवण्यात आला.
रुबी हॉस्पिटलचे डॉ. राघव बर्गे, ससून हॉस्पिटलचे श्रीनिवास शिंत्रे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रवीण पारगावकर, मानसशास्त्र तज्ज्ञ
आनंद कुलकर्णी, तन्मय पेंडसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन जगन्नाथ कळसकर यांनी केले. आभार सहायक पोलीस आयुक्त ढमाले यांनी मानले.

दर आठवड्याला होणार प्रसारित
वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत टाळाटाळ करण्याचे प्रकार वाहन चालकांकडून वारंवार होत असतात. त्यापार्श्वभूमीवर वाहतूक शाखेतर्फे नागरिकांचे वाहतूकनियमांविषयी प्रबोधनासाठी हेल्मेटचा वापर, झेब्रा क्रॉसिंग, गाडी चालविताना मोबाईलचा वापर टाळावा अशा विविध विषयांवर चित्रफिती तयार केल्या आहेत. आठवड्याला त्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Web Title: The rules of the traffic rules are the same as Punekar, the slogan of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.