मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, चालक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 11:15 AM2018-08-18T11:15:08+5:302018-08-18T11:16:09+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक बसून विचित्र अपघात झाला आहे.

road accident at mumbai pune expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, चालक जखमी 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, चालक जखमी 

Next

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक बसून विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एक चालक जखमी झाला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास किमी 45/700 जवळ हा अपघात झाला.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या एका कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनरने समोर जाणार्‍या इनोव्हा गाडीला धडक दिली. त्यामुळे इनोव्हा गाडी समोर जाणार्‍या बीएमडब्लू कारला धडकली तर सदरचा कंटेनरअजून एका कंटेनरला धडकला. यामध्ये कंटेनरचा चालक काही वेळ गाडीत अडकला होता. अपघाताची माहिती समजताच खंडाळा महामार्गचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आयआरबी व देवदूत पथक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला गाडीतून बाहेर काढले. अपघातग्रस्त वाहने बाजुला करत वाहतूक सुरु केली आहे. मात्र अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.


 

Web Title: road accident at mumbai pune expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.