पुन्हा दुमदुमणार औंध आयटीआयची गल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 05:14 AM2018-05-25T05:14:07+5:302018-05-25T05:14:07+5:30

‘लोकमत’ व हिरो ड्युएट प्रस्तुत, खत्री बंधू आइस्क्रीम व मस्तानी आणि जिओ यांच्या सहयोगाने

Repeat the rocks and the ITI's alley | पुन्हा दुमदुमणार औंध आयटीआयची गल्ली

पुन्हा दुमदुमणार औंध आयटीआयची गल्ली

Next

पुणे : आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही धमाल करण्याची संधी मिळेल. आयटीआय कॉलेजसमोर, परिहार चौक, औंध येथे दि. २७ मे रोजी सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत धमाल गल्लीत सहभागी होता येईल. यात फक्त मनोरंजन होणार नाही, तर लहान मुलांवर चांगले संस्कार; तसेच बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल.
मराठी चित्रपट अभिनेत्री नम्रता गायकवाड कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल. ‘सोबत’ चित्रपटातील रुचिरा जाधव, काश्मिरा विसाळे, हेमांशू विसाळे हे अभिनेते उपस्थित राहणार आहेत. बाल विकास मंच व सखी मंचाच्या सभासदांना आपल्या संपूर्ण कुटुंबासह; तसेच इतर लोकांनादेखील धमाल गल्लीचा आनंद अनुभवता येईल. हिरो ड्युएट लोकमत धमाल गल्ली पॉवर्ड बाय खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी, जिओ फोन, किड्स एज्युकेशन पार्टनर, शांती ज्युनिअर स्कूल औंध, अरेना अ‍ॅनिमेशन औंध, हॉटेल भैरवी औंध, धीरेंद्र आऊटडोअर मीडिया सोल्युशन, रोबोटिक्स पार्टनर, इंडिया फस्ट रोबोटिक्स पुणे यांच्या सहयोगाने; तसेच पुणे शहर पोलीस, पुणे शहर वाहतूक शाखा आणि पुणे महापालिका यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम पार पडेल.

उपक्रमांत सहभागी होण्याची संधी या कार्यक्रमात पाच भाग्यवान विजेत्यांना मिळणार ‘हिरो ड्युएट’तर्फे चांदीचे नाणे.
उपस्थितांपैकी २५ भाग्यवंतांना मिळणार ‘खत्रीबंधू’ंतर्फे आकर्षक ‘कूल कूल’ कूपन. या कार्यक्रमात सेल्फी काढून फेसबुकवर टॅग करा. यातील निवडक सेल्फी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केले जातील. अरेना अ‍ॅनिमेशन औंध यांच्याकडून बेस्ट सेल्फी स्पर्धेचे आयोजन; तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

Web Title: Repeat the rocks and the ITI's alley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.