अपंग ‘कल्याणा’चा आधार पुन्हा खिळखिळा, बालाजी मंजुळे यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 03:09 AM2019-02-21T03:09:42+5:302019-02-21T03:09:56+5:30

बालाजी मंजुळे यांची बदली : साडेअठरा वर्षांत १३ आयुक्त, केवळ दोनच अधिकारी पूर्ण करू शकले कार्यकाळ

Rehabilitation of the disabled 'Kalyana' again, Balaji Manjule replaces him | अपंग ‘कल्याणा’चा आधार पुन्हा खिळखिळा, बालाजी मंजुळे यांची बदली

अपंग ‘कल्याणा’चा आधार पुन्हा खिळखिळा, बालाजी मंजुळे यांची बदली

Next

पुणे : दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी स्थापण्यात आलेल्या आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची काही महिन्यांतच बदली करण्याचा राज्यसरकारने कायम ठेवला आहे. अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची अवघ्या ५२ दिवसांमध्ये नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी बदली केली आहे. गेल्या साडेअठरा वर्षांमध्ये या आयुक्तालयाने तब्बल १३ अधिकारी पाहिले आहेत. अवघे दोनच अधिकारी आपला कार्यकाल पूर्ण करु शकले आाहेत. उर्वरित अधिकाºयांनी सरासरी ११ महिने देखील कार्यकाल मिळाला नाही.

राज्यात २००० साली अपंग कल्याण आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. राज्याचे पहिले अपंग कल्याण आयुक्त म्हणून सी. ए. पाठक यांनी पदाभार स्वीकारला. त्यांनी दोन वर्षे या पदावर काम केले. आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर आर. के. गायकवाड आणि बाजीराव जाधव या ज्येष्ठ सनदी अधिकाºयांनी कार्यकाल पूर्ण केला. गायकवाड यांना चार वर्षे ५ महिने आणि जाधव यांना ४ वर्षे ४ महिने कार्यकाल मिळाला. म्हणजेच साडेअठरा वर्षांतील साडेआठ वर्षे या दोन अधिकाºयांनी काम पाहिले. उर्वरित अकरा अधिकाºयांना दहा वर्षांचा कालावधी मिळाला. राज्यात सुमारे २९ लाख दिव्यांग असून त्यांना आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देणे, राज्य व केंद्र शासनाकडून दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाºया योजनांची अंमलबजावणी करणे, दिव्यांगांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे काम आयुक्तालयाकडून केले जाते. मात्र, काही अधिकारी या पदाला दुय्यम पोस्ट समजतात. त्यामुळे पदावर रुजू झाल्यानंतर काही महिन्यांतच ते बदली करून घेत असल्याचे आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. काही अधिकाºयांनी दोन ते आठ महिनेच आयुक्तपदी काम पाहिले आहे. दरम्यान आत्ताचे आयुक्त मंजुळे ३१ डिसेंबर २०१८ रोजी आयुक्तालयात रुजू झाले. पदभार घेतल्यानंतर त्यांनी कामचुकार करणाºया उपायुक्तांना पुन्हा राज्य सरकारच्या सेवेत पाठविण्याची कारवाई केली होती. तसेच, दिव्यांगांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, क्रीडा प्रबोधिनीदेखील प्रस्तावित केली होती. याशिवाय दिव्यांगांना ओळख मिळावी यासाठी युनिक कार्ड वितरणाची मोहीमही हाती घेतली होती. अल्पकाळात त्यांनी दिव्यांग विकास धोरणावर काम करण्यास सुरुवात केली होती. अवघ्या दोन महिन्यांच्या आत झालेल्या त्यांच्या बदलीने अपंग कल्याण आयुक्तालयाचे कामकाज पुन्हा खिळखिळे झाले असल्याचे बोलले जात आहे.

प्रहार करणार बदलीविरोधात आंदोलन
अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची तडकाफडकी बदली केल्याच्या निषेधार्थ प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने गुरुवारी (दि. २१) समाज कल्याण आयुक्तालयासमोर दुपारी १२ वाजता निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा संघटक सुनील शिंदे यांनी दिली. अपंग कल्याण आयुक्तालयात अपवाद वगळता अधिकारी आपला कालावधी पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे आयुक्तालयाच्या कामास खीळ बसत आहे. मंजुळे यांनी अल्पावधीतच दिव्यांगांच्या कल्याणकारी धोरणाला चालना मिळेल, असे निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांची तत्काळ केलेली बदली धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया संयुक्त अपंग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे यांनी व्यक्त केली.

अपंग कल्याण आयुक्तांचा कार्यकाल
अधिकाºयाचे नाव पद स्वीकारले पद सोडले
सी. ए. पाठक २४/१०/२००० २/१०/२००२
सोनिया सेटी ३/१०/२००२ ७/११/२००२
डॉ. संजय चहांदे ८/११/२००२ १९/४/२००३
डॉ. के. एच. गिविंदराज २०/४/२००३ ३०/६/२००४
आर. के. गायकवाड ८/८/२००४ ११/१/२००८
नितीन गद्रे ११/१/२००८ १०/१०/२००८
एम. एच. सावंत ७/२/२००९ ५/१०/२०१०
बाजीराव जाधव ५/१०/२०१० २८/२/२०१४
ज्ञा. स. राजुरकर २८/२/२०१४ ६/८/२०१४
नरेंद्र पोयाम २६/८/२०१४ २२/५/२०१६
नितीन पाटील १६/६/२०१६ १३/४/२०१८
रुचेश जयवंशी १९/४/२०१८ १४/११/२०१८
बालाजी मंजुळे ३१/१२/२०१८ २०/२/२०१९

Web Title: Rehabilitation of the disabled 'Kalyana' again, Balaji Manjule replaces him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे