स्मार्ट सिटीचा निधी देण्यास नकार, मागील निधीचा हिशोब नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:51 AM2018-03-22T03:51:49+5:302018-03-22T03:51:49+5:30

गाजावजा होत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेचा पुढील वर्षाचा निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला. महापालिका प्रशासनानेच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील सभेत सादर करावा, असा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिला.

 Refusing to fund the smart city, there is no accounting of the previous fund | स्मार्ट सिटीचा निधी देण्यास नकार, मागील निधीचा हिशोब नाही

स्मार्ट सिटीचा निधी देण्यास नकार, मागील निधीचा हिशोब नाही

Next

पुणे : गाजावजा होत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेचा पुढील वर्षाचा निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला. महापालिका प्रशासनानेच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील सभेत सादर करावा, असा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिला.
स्मार्ट सिटीचा पुढील निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला आहे का, असा प्रश्न काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सभेत विचारला. प्रशासनाने त्यावर गुळमुळीत उत्तर दिले. त्यावर शिंदे यांनी केंद्र सरकारचे ते पत्र आपल्याकडे आहे, असे सांगितले व वाचून दाखवू का, अशी विचारणा केला. केंद्र सरकारने निधी देण्यास नकार दिला आहे का, अशी विचारणा त्यांनी पुन्हा केली. अपेक्षेपेक्षा कमी काम झाले असल्याची टीका या पत्रात आहे का, असेही त्यांनी विचारले. पत्र सर्वसाधारण सभेपासून लपवले गेले, असा आरोपही त्यांनी केला.
आयुक्त व स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक कुणाल कुमार यावेळी उपस्थित होते. मात्र या प्रश्नाला अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी उत्तर दिले. आतापर्यंत दिलेल्या निधीच्या खर्चाची माहिती पाठवल्यानंतर निधी मिळेल, निधी देणार नाही, असे कळवलेले नाही, माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे असे त्यांनी सांगितले. शिंदे यांनी त्यावर आतापर्यंत २० टक्केच निधी खर्च झाला आहे, त्याचीही माहिती पाठवलेली नाही, त्यामुळे निधी दिलेला नाही, असे सांगितले. आयुक्त कुणाल कुमार यांनीही ते मान्य केले. माहिती पाठवल्यानंतर निधी मिळेल, असे ते म्हणाले.

Web Title:  Refusing to fund the smart city, there is no accounting of the previous fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे