झोपडपट्टीवासीयांच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध : राजू पवार

By admin | Published: October 2, 2014 12:05 AM2014-10-02T00:05:18+5:302014-10-02T00:05:18+5:30

आजर्पयत राजकारण्यांनी झोपडपट्टीवासीयांकडे केवळ एकगठ्ठा मते देणारी मतपेढी म्हणून बघितले आणि निवडणुकीनंतर त्यांना वा:यावर सोडून दिले.

Raju Pawar is committed to the development of the slum dwellers: Raju Pawar | झोपडपट्टीवासीयांच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध : राजू पवार

झोपडपट्टीवासीयांच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध : राजू पवार

Next
पुणो : आजर्पयत राजकारण्यांनी झोपडपट्टीवासीयांकडे केवळ एकगठ्ठा मते देणारी मतपेढी म्हणून बघितले आणि निवडणुकीनंतर त्यांना वा:यावर सोडून दिले. मात्र, मी आणि माझा पक्ष झोपडपट्टीवासीयांच्या वेदना जाणत असून सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजू पवार यांनी दिली. आपल्या प्रचाराचा शुभारंभ पवार यांनी नुकताच मतदारांच्या भेटी घेऊन केला. त्यासाठी पवार यांनी मतदारसंघातील विविध झोपडवस्त्यांमध्ये झालेल्या कोपरा सभांत हे आश्वासन दिले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका:यांसह नागरिक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. 
या वेळी पवार म्हणाले, की कोणताही माणूस स्वखुषीने झोपडपट्टीमध्ये राहत नाही. शहर कितीही पुढारले, तरी झोपडपट्टीमध्ये राहून समाजाला सेवा देणा:या, घरकाम करणा:या महिला, कुशल कारागीर, अकुशल मजूर यांची समाजाला आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना रहिवासासह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणो ही सरकारची आणि समाजाची जबाबदारीच आहे; मात्र अनेक वर्षापासून रखडलेल्या एसआरए योजनेमुळे शेकडो नागरिकांचे पुनर्वसन झालेले नसल्याचे पवार यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित असताना प्रत्येक राजकीय पक्ष त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत, झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन योजना जाहीर केली.
मात्र, प्रत्यक्षात ही योजना झोपडपट्टीवासीयांच्या हिताची न ठरता बिल्डरांच्या तुंबडय़ा भरणारी ठरली आहे, अशी टीका करून पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजना बिल्डरमार्फत नव्हे; तर सरकारमार्फत राबवावी अशी आपली आग्रही मागणी असून निवडणूक झाल्यानंतर त्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. या कोपरा सभांमध्ये उपस्थित झोपडपट्टी धारकांनीही पवार यांच्यासमोर  झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झालेल्या फसवणूक, अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा पाढाच वाचला. आम्हाला आमच्या राहण्याच्या आणि कामाच्या ठिकाणाजवळच हक्काचे घर मिळावे; या ठिकाणाहून उचलून शहराबाहेर घालवू नये, अशी मागणीही त्यांनी या सभेत केली. 
दरम्यान, पवार यांच्याकडून निवडणूक प्रचारासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
 
4 मतदारसंघातील सुमारे 3क् टक्के लोकसंख्या असलेल्या 36 झोपडपट्टय़ांमध्ये राहणा:या नागरिकांच्या सर्वागीण प्रगतीसाठी प्रय} करणार असल्याचे सांगून पक्षाच्या ब्लू प्रिंटनुसार शहरविकासावर आपला भर राहणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: Raju Pawar is committed to the development of the slum dwellers: Raju Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.