रेनवॉटर हार्वेस्टिंग फक्त सवलतीसाठीच, सोसायट्यांचा पुढाकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 03:57 AM2018-06-14T03:57:49+5:302018-06-14T03:57:49+5:30

शहरातील जास्तीत जास्त सोसायट्यांनी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी महापालिकेच्या वतीने अनुदान देण्याचा निर्णय घेतला. परंतु पाणी बचतीचे फारसे महत्त्व नसल्याने ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’कडे पुणेकरांकडून दुर्लक्षच केले जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Rainwater Harvesting is not the only initiative, not the Society's initiative | रेनवॉटर हार्वेस्टिंग फक्त सवलतीसाठीच, सोसायट्यांचा पुढाकार नाही

रेनवॉटर हार्वेस्टिंग फक्त सवलतीसाठीच, सोसायट्यांचा पुढाकार नाही

Next

पुणे  - शहरातील जास्तीत जास्त सोसायट्यांनी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी महापालिकेच्या वतीने अनुदान देण्याचा निर्णय घेतला. परंतु पाणी बचतीचे फारसे महत्त्व नसल्याने ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’कडे पुणेकरांकडून दुर्लक्षच केले जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहरामध्ये तब्बल ८ लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत मिळकती असून, यापैकी केवळ १० हजार ४८५ सोसायट्यांमध्ये ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प सुरू असल्याची अधिकृत माहिती महापालिकेकडून देण्यात आली. यामध्येही मिळकतकरातील सवलतीसाठी प्रकल्प उभारले असले तरी प्रत्यक्षात ते चालू नसल्याचेही दिसून आले आहे.
राज्यातील अन्य सर्व शहरांपेक्षा पुणेकरांना प्रतिमाणसी प्रतिलिटर सर्वाधिक पाणी मिळते. शहराच्या उशाला चार-चार धरणे असल्याने व पाणीबचतीचे फारसे गांभीर्य नसल्याने पुणेकर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. परंतु शहराची लोकसंख्या प्रचंड झपाट्याने वाढत आहे. यामुळे खडकवासला प्रकल्पातील मंजूर पाणीसाठा कमी पडत असल्याची चर्चा नेहमीच होते. त्यात गेल्या काही वर्षांत राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या, पाणीटंचाईच्या झळा पुणेकरांनादेखील सहन कराव्या लागल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी पाणीटंचाईमुळे पुणेकरांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने शहरात २००५ पूर्वीच्या सहकारी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सुविधा सुरू करणाऱ्या सोसायट्यांना अनुदान देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला. पाणी बचतीचे प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला तरी शहरातील सोसायट्यांनी अद्यापही फारसा पुढाकार मात्र घेतलेला नाही.
सन २००५ नंतर शहरात उभा राहणाºया सर्व प्रकल्पांंमध्ये ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सुविधा करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु त्यानंतरदेखील शहरातील अनेक नवीन प्रकल्पांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची सुविधा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरामध्ये दरवर्षी किमान सरासरीएवढा पाऊस होत असताना केवळ पाणीबचत, साठवण न केल्याने पावसाचे लाखो लिटर पाणी वाहून जाते. यामुळे गेल्या काही वर्षांत दर उन्हाळ्यामध्ये शहराच्या उपनगरांमध्ये नव्याने उभ्या राहिलेल्या अनेक सोसायट्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. एप्रिल-मे किमान दोन महिने पाण्याच्या टँकरसाठी सोसायट्यांकडून लाखो रुपये खर्च केला जातो. परंतु रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याकडे सोसायट्यांकडून दुर्लक्ष केले जाते.

आधी केले नंतर सांगितले, या उक्तीप्रमाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये मुख्य इमारतीसह शहरातील नाट्यगृहे, सरकारी रुग्णालय, क्षेत्रीय कार्यालय व काही शाळांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची सुविधा सध्या उपलब्ध आहे. अद्याप काही इमारतींमध्ये ही सुविधा नसून, येत्या काही महिन्यांत शंभर टक्के सरकारी इमारतींमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- शिवाजी लंके,
महापालिका भवन विभागप्रमुख

2005
सन २००५ नंतर शहरात उभ्या राहणाºया सर्व प्रकल्पांंमध्ये ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सुविधा करणे कायद्याने बंधनकारक आहे.

पुण्याचे केपटाऊन होण्यास वेळ लागणार नाही

पुणे शहरातील नद्यांचे पाणी प्रदूषणामुळे वापरण्यास योग्य नाही. शहरामध्ये १५ हजारांपेक्षा अधिक बोअरवेल घेऊन भूगर्भातील पाणीसाठा झपाट्याने कमी करत आहोत. शहरात सरासरी पाऊस पडतो. परंतु पावसाचे हे पाणी साठविण्यासाठी किंवा भूगर्भामध्ये जिरविण्यासाठी कोणतेही प्रयत्न पुणेकरांकडून होत नाहीत. यामुळे येत्या काही वर्षांत पुण्याचे केपटाऊन होण्यास वेळ लागणार नाही. शहरात २००२ पासून ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’च्या जनजागृतीचे काम करत आहोत; पण पुणेकरांकडून अपेक्षित तेवढा प्रतिसाद मिळत नाही. शासनाने बंधनकारक करून, महापालिकांकडून करात सूट देऊन, अनुदान देऊनदेखील पुणेकरांना पाण्याचे महत्त्व कळत नाही, ही खेदाची बाब आहे. याउलट बीडसारख्या मागासलेल्या भागातील लोक स्वत: खर्च करून रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेतात, हे विशेष.
- कर्नल शशिकांत दळवी, रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांचे अभ्यासक
 

Web Title: Rainwater Harvesting is not the only initiative, not the Society's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.