पुरंदर उपसा योजना खोळंबली, शेतकरी आला अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 02:46 AM2018-03-07T02:46:18+5:302018-03-07T02:46:18+5:30

दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणा-या पुरंदर उपसा जलसिंचन योजना सध्या पुरेशी मागणी असूनही दर निश्चित केले नसल्याने शासनाच्या १९% दराचे पाणी सोडण्यात ही योजना खोळंबली आहे.

 Purandar Upasak Yojana, Khollbali, Farmers are facing difficulties | पुरंदर उपसा योजना खोळंबली, शेतकरी आला अडचणीत

पुरंदर उपसा योजना खोळंबली, शेतकरी आला अडचणीत

googlenewsNext

भुलेश्वर  - दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणाºया पुरंदर उपसा जलसिंचन योजना सध्या पुरेशी मागणी असूनही दर निश्चित केले नसल्याने शासनाच्या १९% दराचे पाणी सोडण्यात ही योजना खोळंबली आहे.
राज्यातील बहुतांशी योजना वीजबिलापोटी बंद आहेत. सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येत आहेत. उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नातून उपसा सिंचन योजनेच्या एकुण वीजबिलापैकी ८१ टक्के विजेचा भार राज्य शासन भरणार आहे. उरलेले १९ टक्के वीजबिल उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थी शेतकºयांनी भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पुरंदर उपसा जलसिंचन योजना ही तीन हंगामात चालवली जाते. खरीप हंगामातील पाण्याचा दर एक एमसीएफटी पाण्यासाठी पंच्चावन्न हजार रुपये मोजावे लागत होते. तर रब्बी हंगामासाठी सत्तावन्न हजारांपर्यंत हा दर वाढत जायचा व उन्हाळी हंगामासाठी हाच दर साठ हजारांपर्र्यंत गेला.
पुरंदर उपसा जलसिंचन योजना अनेक गावांना वरदान ठरत आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी वाघापूर येथील घाटुळीआई मंदिराजवळ आल्यानंतर ते दिवे, माळशिरस, राजेवाडी पाईपलाईन द्वारे देण्यात येते. यात पाण्याचे विभाजन करुन त्या लाईनवरील शेतकºयांना दिले जाते. पाणी महाग असले तरी पुरंदर तालुक्यातील शेतकरी पैसे जमा करुन पाणी घ्यायचे व विविध पिके करतात.
सध्या उन्हाळी हंगामात १९ टक्के दराने पाणी मिळणार असल्याने पुरंदरचा शेतकरी सुखावला आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या आॅफिसमध्ये तसे परिपत्रकही आले आहे. मात्र पाणी आकारणी दर निश्चित करण्यात न आल्याने एक मार्चपासून सुरु होणारी पुरंदर उपसा जलसिंचन योजना आजही पुरेशी मागणी असूनही बंद आहे. खरे तर एक मार्च अगोदरच दर निश्चित होणे गरजेचे होते. मात्र अद्यापही दर निश्चित करण्यात आले नाही. यामुळे शेतकºयांकडून नक्की किती पैसे घ्यायचे याचा मेळ बसवण्यात आला नाही. यामुळे एक मार्चपासून शेतकºयांनी मागणी करुनही पैसे स्वीकारण्यास कोणीही तयार नाही. यामुळे शेतकरी वर्गामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले.

उन्हाळी हंगामाचे फॉर्म भरण्यास सुरुवात...

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे उन्हाळी हंगामातील पाण्याची मागणी नोंदवताना मागणी फॉर्म भरुन देण्यात सुरुवात झाली आहे. या फॉर्मला शेतकºयांचा सातबारा जोडावा लागणार आहे. कालपासून अनेक शेतकरी फॉर्म नेऊन मागणी नोंदवत आहेत. फॉर्म भरुन दिल्यानंतर १९ टक्के दराने पैसे स्वीकारण्यात येणार आहेत.

योजनेची चोरी वाढली...
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला पाणी चोरी काही नवीन नाही. गळणाºया एअरवॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. याचा भुर्दंड पाणी घेणारांवर पडतो. पाणी पुरेशा दाबाने मिळू शकत नाही. मागणी केलेल्या शेतकºयांना पाणी देताना पाठीमागे कोणीही या योजनेचे वॉल फिरवून मागणी नसतानाही पाणी घेतात. यामुळे ही योजना अडचणीत येते.

दुरुस्ती झालीच नाही...
पुरंदर उपसा जलसिंचन योजना पाऊस पडल्यापासून बंद आहे ती आजतागायत. या कालावधीत या योजनेची झालेली दुरवस्था दूर करण्यात यावी अशी मागणी लाभार्थी गावातील शेतकºयांनी केली होती. मात्र योजना बंद असूनदेखील कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आली नाही. या योजनेचे अनेक एअरवॉल मोठ्या प्रमाणात गळतात. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. मागणी करूनही ही कामे पूर्ण न केल्यामुळे ज्या वेळी ही योजना सुरु होईल त्या वेळेस गळणाºया एअरवॉलमधून लाखो लिटर पाणी वाया जाणार आहे.

कर्मचा-यांची संख्या कमी...
पुरंदर उपसा योजनेला सुरुवातीपासूनच कर्मचाºयांची संख्या कमी आहे. यामुळे पाण्याचे पैसे भरताना लगेच पावती दिली जात नाही. योजनेच्या लाईनवर अधिकाºयांना फिरता येत नाही. शेतकºयांची मागणी, पैसे गोळा करणे, पावती देणे, पाण्याचे वाटप करणे, शेतक-यांशी संवाद साधणे, पाणीसंस्था उभ्या करणे इत्यादी कामांसाठी कर्मचाºयांची संख्या कमी आहे. ती वाढविण्याची मागणी लाभार्थी गावातील शेतकरी करीत आहेत.

Web Title:  Purandar Upasak Yojana, Khollbali, Farmers are facing difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे