ट्रॅफिक जामने पुणेकर हैराण ; मेट्राेच्या कामामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहनचालकांचा माेर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 03:45 PM2019-03-16T15:45:27+5:302019-03-16T15:52:03+5:30

पुण्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ट्रॅफिक जामच्या समस्येला पुणेकरांना सामाेरे जावे लागत आहे.

punekar has to face traffic jam daily | ट्रॅफिक जामने पुणेकर हैराण ; मेट्राेच्या कामामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहनचालकांचा माेर्चा

ट्रॅफिक जामने पुणेकर हैराण ; मेट्राेच्या कामामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहनचालकांचा माेर्चा

पुणे : पुण्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ट्रॅफिक  जामच्या समस्येला पुणेकरांना सामाेरे जावे लागत आहे. त्यातच कर्वे रस्त्यावर मेट्राेचे काम सुरु असल्याने वाहनचालक आतील रस्त्यावरुन आपली वाहने नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कर्वे रस्त्याच्या अंतर्गत रस्त्यांवर माेठ्याप्रमाणावर ट्रॅफिक जाम हाेत असून भर दुपारी उन्हाच्या कडाक्यात पुणेकरांना अडकून पडावे लागत आहे. 

सध्या कर्वे रस्त्यावरील मेट्राेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेट्राेच्या कामामुळे दाेन्ही बाजूंना बॅरिगेट टाकण्यात आल्याने वाहतुकीस रस्ता कमी पडत आहे. सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला या रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक असते. कर्वे रस्त्यावर वाहतूककाेंडी हाेत असल्याने वाहनचालक अंतर्गत रस्त्यांचा वापर करतात. अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने तसेच छाेटे छाेटे चाैक या ठिकाणी असल्याने अंतर्गत रस्त्यांवर देखील वाहतूक काेंडी हाेत आहे. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. 

पुण्यात दरराेज 700 ते 1000 नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. दुचाकींची संख्या 36 लाखांवर गेली आहे. असे असताना शहरात ठिकठिकाणी मेट्राेचे काम सुरु असल्याने या वाहतूक काेंडीत भर पडत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून यामुळे प्रदूषणात देखील माेठी वाढ हाेत आहे. संध्याकाळी डेक्कन पासून काेथरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्य रांगा लागत आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर देखील पदपथांचे काम सुरु असल्याने वाहतूक काेंडीत आणखीनच भर पडत आहे. सध्याचा फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता अपूरा पडत असताना माेठे पदपथ करण्यात येत असल्याने वाहतूकीची समस्या येत्या काळात सुद्धा उद्भवण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती पेठांमधील रस्त्यांवर देखील पाहायला मिळत आहे. 

Web Title: punekar has to face traffic jam daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.