पुणेकर गीत रामायणातील अविट गोडीची गीते अनुभवणार, रामनवमीच्या पूर्वसंध्येला सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:31 AM2024-04-12T11:31:07+5:302024-04-12T11:31:26+5:30

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कर्वेनगर, डीपी रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे ख्यातनाम संगीतकार श्रीधर फडके यांच्या अवीट गीतांची मैफल सजणार आहे. येताय ना मग, सर्वजण राममय व्हायला!

Punekar Geet will enjoy the songs of Ramayana with eternal sweetness, the ceremony will be held on the eve of Ram Navami. | पुणेकर गीत रामायणातील अविट गोडीची गीते अनुभवणार, रामनवमीच्या पूर्वसंध्येला सोहळा

पुणेकर गीत रामायणातील अविट गोडीची गीते अनुभवणार, रामनवमीच्या पूर्वसंध्येला सोहळा

पुणे : ‘आधुनिक वाल्मीकी’ अशी ख्याती असलेले ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेली आणि बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली अजरामर कलाकृती म्हणजे गीतरामायण. सरस्वतीच्या मंदिरातील नंदादीप अशा पवित्र भावनेतून ‘गीतारामायणा’कडे पाहिले जात असल्याने आजही या कलाकृतीचे गारुड रसिकमनावर कायम आहे. अयोध्येच्या ऐतिहासिक भव्य राममंदिराच्या उभारणीनंतर येत असलेल्या रामनवमीनिमित्त पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत ‘गीतारामायणा’ची जादू पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. मंगळवारी (दि. १६) सायंकाळी पाच वाजता कर्वेनगर, डीपी रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे ख्यातनाम संगीतकार श्रीधर फडके यांच्या अवीट गीतांची मैफल सजणार आहे. येताय ना मग, सर्वजण राममय व्हायला!

मांगल्य, पावित्र्य आणि प्रसन्नता अशा त्रिगुणात्मक सूत्राने सजलेल्या ‘गीतरामायणा’चे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रभू रामचंद्राची कथा अजरामर आहे. अनेक कवी, साहित्यिकांनी साहित्याच्या विविध प्रकारातून ती गुंफली आहे. परंतु, माडगूळकरांनी यात गुंफलेले काव्य व त्यातील भावसौंदर्यामुळे ही कलाकृती वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. या कलाकृतीचा आस्वाद रामभक्तांना घेता येणार आहे. या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी यांचे प्रायोजकत्व व सवाई मसाले यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. तसेच कोहिनूर ग्रुपचे सहकार्य मिळाले आहे. याशिवाय सिद्धी असोसिएटस्, काका हलवाई, गिरीश खत्री ग्रुप आणि चौधरी यात्रा कंपनी प्रा. लिमिटेड हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांच्या अद्वितीय स्वरांमधून ‘गीतरामायणा’ची गोडी अनुभवायला मिळणार आहे. श्रीधर फडके यांनी ‘लक्ष्मीची पाऊले’ या चित्रपटाद्वारे संगीत दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. त्यांचे ‘ऋतू हिरवा’ , ‘फिटे अंधाराचे जाळे’ यांसारखे विविध अल्बमही प्रसिद्ध आहेत.

कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश.

काही जागा राखीव

कार्यक्रमास प्रवेश फक्त निमंत्रण पत्रिकेवरच दिला जाईल.

सखी मंच सदस्य आणि कुटुंबीयांना आयकार्डावर विनामूल्य प्रवेश.

कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य, पण प्रवेशिका आवश्यक.

विनामूल्य प्रवेशिका पुढील केंद्रावर उपलब्ध (दुपारी २ पासून) : पीएनजी ज्वेलर्स : ६९४ पीएनजी हाऊस, कुंटे चौक, लक्ष्मी रोड दुकान क्रमांक ५-६, कॉमर्स अव्हेन्यू, पौड रोड, समोर, पुण्यई सभागृह, महागणेश कॉलनी, कोथरुड काका हलवाई स्वीट सेंटर : चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, कोथरुड प्रेस्टीज कॉर्नर, गणेशनगर रोड, नवसह्याद्री, अलंकार पोलिस स्टेशन शेजारी. • आयुर्वेद रसशाळेसमोर, कर्वे रोड, एरंडवणे खत्री बंधू पॉट आइस्क्रीम आणि मस्तानी : न्यू फ्रेंड्स कंपनी, पौड रोड, लोकमान्य कॉलनी, कोथरुड विठ्ठल मंदिरासमोर, मधुसंचय सोसायटी, कर्वेनगर, गोयल गंगा हाऊसिंग सोसायट, खाऊगल्ली, माणिकबाग, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड : श्रेयस अपार्टमेंट, नवीन डीपी रोड, गुरुगणेश नगर, कोथरुड • सेनापती बापट रोड, रत्ना हॉस्पिटलशेजारी, मॉडेल कॉलनी बांदल कॅपिटल, पौड रोड मीना सोसायटी, डहाणूकर कॉलनी, कोथरुड रसिक साहित्य, अप्पा बळवंत चौक पुणे • महालक्ष्मी लॉन्स : राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, लोकमत कार्यालय : वीया विंटेज, दुसरा मजला, लॉ कॉलेज रोड वडगांव खुर्द, सिंहगड रोड.

सिद्धी असोसिएटस, ७५२ कुमठेकर रोड, सदाशिव पेठ.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९०२८४४५४७६

Web Title: Punekar Geet will enjoy the songs of Ramayana with eternal sweetness, the ceremony will be held on the eve of Ram Navami.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.