पुणे: सोशल मीडियाचे उलगडले दुष्परिणाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 05:40 AM2017-12-18T05:40:38+5:302017-12-18T05:40:56+5:30

सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी याच्या विळख्यात सापडले असताना त्यावर अनोळखी संवाद हा कुठल्याही तरुण किंवा तरुणीला संकटात अडकवतो आहे

Pune: Unleashed negative consequences of social media! | पुणे: सोशल मीडियाचे उलगडले दुष्परिणाम !

पुणे: सोशल मीडियाचे उलगडले दुष्परिणाम !

Next

पुणे : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी याच्या विळख्यात सापडले असताना त्यावर अनोळखी संवाद हा कुठल्याही तरुण किंवा तरुणीला संकटात अडकवतो आहे, हा संदेश मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या एकांकिकेतून देण्यात आला. निमित्त होते पुरुषोत्तम महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे. आज सात एकांकिकांचे सादरीकरण झाले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने नाटक या एकांकिकेतून अभिनयाची तरुणवर्गाची धडपड दाखवली आहे. त्यामध्ये दोन मित्र अभिनयक्षेत्रात येण्यासाठी मुंबईला आॅडिशनसाठी येतात. पण त्या वेळी दोघांपैकी एकाची निवड होते आणि दुसरा आपले व्यक्तिमत्त्व कमी असल्याने मागे पडतो आणि आपण अभिनयात कमी आहोत, या कल्पनेने आत्महत्या करतो. महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालयाने वाघ येणार आहे, या एकांकिकेतून दोन कलाकारांद्वारे गोष्ट दाखवली आहे. दोन्ही पात्रे रेल्वे ट्रॅक बदलण्याच्या कार्यालयात कार्यरत असतात. एक साहेब असतो आणि दुसरा त्या कार्यालयाचा नोकर असतो. साहेब काही कारणामुळे तणावात असल्याने त्याला त्या तणावातून मुक्त करण्यासाठी नोकर एक नाटक रचतो. तो आपल्या कार्यालयाबाहेर एक वाघ आहे, असे सांगून त्या मालकाला घाबरवून सोडतो आणि पूर्ण काळ अडकवून ठेवून शेवटी मी तुम्हाला तणावातून बाहेर काढण्यासाठी हे नाटक केले असे सांगतो.
श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाने विवर या एकांकिकेतून दोन स्त्री कलाकारांची आयुष्यावर आणि भावनिक गोष्टींवर चर्चा दाखवली आहे. एका कुटुंबातील महिला आणि एक तरुणी या दोघी वेगवेगळ्या जातीच्या असतात. तरुणी आपली जात, धर्म मानत नसते आणि महिलेला आपल्या धर्माचा खूपच अभिमान असतो. पण शेवटी असा प्रसंग येतो, की तरुणी समोर सर्व जातीभेद विसरून ती आपल्या धर्मासहित इतर धर्माचाही आदर करू लागते.
‘दृष्टांत’मध्ये पांडुरंंगाची भक्ती -
संताजी महाविद्यालयाने दृष्टांत या एकांकिकेतून पांडुरंगाच्या भक्तीचा आणि तुकाराम महाराजांच्या गाथेचा सवांद दोन कलाकारांमध्ये दाखवला आहे. ते दोघे तुकाराम आणि पांडुरंग यांच्याबद्दल आपली मते मांडत होते. तसेच नाटकातून तुकारामांची शिकवण आणि तुकारामांची पांडुरंगाबद्दलची भक्ती यावरही चर्चा करत होते.

Web Title: Pune: Unleashed negative consequences of social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.