Pune: सत्यशोधक समितीला राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचा विरोध, समितीमध्ये नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्याची मागणी 

By श्रीकिशन काळे | Published: February 6, 2024 12:04 PM2024-02-06T12:04:22+5:302024-02-06T12:05:27+5:30

Pune: सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रमध्ये झालेल्या 'जब वी मेट' या नाटकामधील गोंधळाप्रकरणी जी सत्यशोधक समिती स्थापन केली आहे, त्या समितीला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विरोध करीत आहे.

Pune: Opposition of Nationalist Cultural Department to Satyashodhak Committee, demand to include experts in the field of theater in the committee | Pune: सत्यशोधक समितीला राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचा विरोध, समितीमध्ये नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्याची मागणी 

Pune: सत्यशोधक समितीला राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचा विरोध, समितीमध्ये नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्याची मागणी 

- श्रीकिशन काळे 
पुणे :  सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रमध्ये झालेल्या 'जब वी मेट' या नाटकामधील गोंधळाप्रकरणी जी सत्यशोधक समिती स्थापन केली आहे, त्या समितीला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विरोध करीत आहे. कारण या कमिटी मध्ये जे जे  सदस्य म्हणून घेतले आहेत, ते एका ठराविक विचार धारेचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. 
पाटील म्हणाले, स्थापन केलेली समिती पाहिल्यानंतर लागणारा निकाल हा फक्त एका बाजूने लागू शकतो, किंवा एकच बाजू समोर येऊ शकते असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे तत्काळ या समितीमध्ये सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे, लेखक दिग्दर्शक अतुल पेठे, लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, राजन गवस, रंगनाथ पठारे यांच्यापैकी कोणत्याही दोन व्यक्तींचा समावेश किंवा तिघांचा समावेश यामध्ये करावा,  अशी आम्ही राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी करीत आहोत.
कारण हल्ला करणारे हे निराळे राहिले आणि ज्यांना मारहाण झाली त्यांच्यांवरच गुन्हे दाखल झाले. आता विद्यापीठाने जी समिती चौकशी करणार आहे, त्यात देखील एकाच विचारधारेशी जोडलेले लोकं आहेत. त्यांनी एकतर्फी निर्णय घेऊ शकतील, म्हणून या समितीमध्ये नाटक्षेत्रातील योग्य व्यक्तींना समाविष्ट करावे, अशी आमची मागणी आहे.

Web Title: Pune: Opposition of Nationalist Cultural Department to Satyashodhak Committee, demand to include experts in the field of theater in the committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.