पुणे : गुन्हेगारीचे उगमस्थान नागझरी ; गुंडांच्या जत्रायात्रांचे स्थान : महापालिका, पोलीस उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:50 AM2018-02-26T05:50:02+5:302018-02-26T05:50:02+5:30

पेशव्यांच्या काळात स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागझरी नाला आता गुंडगिरीचे उगमस्थान व नामचिन गुंडांच्या जत्रायात्रांचे स्थान झाले आहे. महापालिका प्रशासनामुळे नाला अस्वच्छ तर झालाच आहे, पण पोलिसांच्या उदासीनतेने तो गुंडांचे आश्रयस्थानही बनला आहे.

Pune: Citizens of crime; Nagzari; Place of goons: Municipal, Police Depression | पुणे : गुन्हेगारीचे उगमस्थान नागझरी ; गुंडांच्या जत्रायात्रांचे स्थान : महापालिका, पोलीस उदासीन

पुणे : गुन्हेगारीचे उगमस्थान नागझरी ; गुंडांच्या जत्रायात्रांचे स्थान : महापालिका, पोलीस उदासीन

Next

पुणे : पेशव्यांच्या काळात स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागझरी नाला आता गुंडगिरीचे उगमस्थान व नामचिन गुंडांच्या जत्रायात्रांचे स्थान झाले आहे. महापालिका प्रशासनामुळे नाला अस्वच्छ तर झालाच आहे, पण पोलिसांच्या उदासीनतेने तो गुंडांचे आश्रयस्थानही बनला आहे.
गुन्हे करायचे व इथे येऊन रहायचे असा अनेक भुरट्या गुंडांचा खाक्या आहे. पंटर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. गंगाधामपासून महर्षीनगरमार्गे कासेवाडी, तसेच भवानी पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठेत जाणाºया नागझरी नाल्यात गुंडासाठी सुरक्षित असलेले असे अनेक भाग आहेत. त्यापैकीच एका भागात खून करून तीन मृतदेह टाकण्यात आले. त्यामुळे नागझरी नाला चर्चेत आला. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही एरवी तो गुंड, भुरटे चोर वगळता कोणाच्याही गावी नसतो.
गांजेकस, चरसी अशा अमली पदार्थाची नशा करण्यासाठी तर नागझरीचे काही भाग म्हणजे नंदनवन झाले आहेत. ते तिथे बसलेत म्हणून तिथे जायचेच नाही, असे ठरल्यामुळे हे भाग अड्डे म्हणूनच प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध गुंडाला तिथूनच पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तरी त्यांचे या भागाकडे लक्ष जाऊन ते सुरक्षेची काही व्यवस्था करतील, अशी परिसरातील नागरिकांची अपेक्षा होती, मात्र तसे काहीही झाले नाही. उलट हा सगळाच परिसर गेल्या काही वर्षांत असुरक्षित होत गेला आहे. आता तर तिकडे ना पोलीस फिरकत ना महापालिका कर्मचारी. त्यामुळे गुंडांचाच संचार कायम असतो. त्यावरून सतत भांडणे, मारामाºया सुरू असतात. एकाच वेळी तीन खूनही त्यातूनच पडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे यांनी त्यांच्या कासेवाडी परिसरातील नाल्याच्या भागाच्या विकासाचा मुद्दा महापालिकेत मांडला होता. त्यावर स्लॅब टाकून वाहनतळ करावा किंवा दुचाकींसाठी रस्ता करावा, असे त्यांनी सन २००७ मध्ये सुचवले होते. त्यातील वाहनतळ अर्धवट बांधून पडला आहे, तर रस्त्याचा विचारही प्रशासनाने केला नाही. आता अर्धवट बांधलेल्या वाहनतळाच्या खाली उलट चांगली जागा झाली म्हणून व्यवस्थित बैठका वगैरे होत असतात. मॅटर मिटवण्यासाठी म्हणून तिथे कायम गर्दी असते.
घसेटी पूल, दारूवाला पूल असे अनेक पूल नागझरी नाल्यावर आहेत. पेशव्यांच्या काळात हा नदीपासून उगम पावलेला ओढा होता. त्याच्या काठाने वसाहती होत्या. नाल्यात उतरण्यासाठी पायºयाही होत्या, असे माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी सांगितले. लहान असताना आपण या पायºया पाहिल्या आहेत, असे ते म्हणाले. कालांतराने लोकसंख्या वाढत गेली, ओढ्याचा नाला झाला व आता तर त्याची गटारगंगाच झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
काठावर वसल्या झोपड्या : गुंडगिरीमध्ये वाढ-
१काही नगरसेवकांनी नाल्याचा चांगला उपयोग करून घेतला आहे. गावकोस मारुती येथे माजी नगरसेवक रमेश बोडके यांनी त्यांच्या कारकिर्दीत एक उद्यान तयार केले. त्याचा उपयोग आजही केला जातो. त्यांनीही नाला सुधारणा हा विषयच महापालिकेच्या विषयपत्रिकेवर नसल्याचे स्पष्ट केले. शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक झोपडपट्ट्या या नाल्याच्या काठानेच वसल्या आहेत. वेगवेगळे व्यवसाय चालतात. त्यातील बहुतेक फिटरकाम, अमली पदार्थांची विक्री अशा प्रकारचे आहेत. त्यातूनच गुंडगिरीला प्रोत्साहन मिळत असल्याचे बोडके यांनी सांगितले.
२नाल्याचे वेगवेगळ्या पेठांमधले अनेक भाग दिवसा ओकेबोके तर रात्री गजबजलेले असतात. पाऊस जोराचा झाला तरच नाल्यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहते. एरवी नाला कोरडाच असतो. त्यामुळेच आता गुंडांच्या आश्रयस्थानांमध्ये वाढ होत चालली आहे. गुंड तयार करणारी फॅक्टरीच इथे तयार होत आहे. पोलिसांना याची माहिती नसते असे नाही, पुर्ण माहिती असते. त्यामुळेच ते बरोबर यायचे तेव्हाच येतात, नेमक्या काही जणांनाच भेटतात व लगेच जातातही, कारवाई काहीच होत नाही. तेच असे पाठीराखे झाल्यामुळे नागझरीच्या नाल्यात गुंडांचे फावले आहे.
उद्याने करावीत-
नाल्यावर स्लॅब टाकून त्यावर उद्याने करावीत, असा प्रयत्न होता. माझ्या प्रभागात तो मी गावकोस मारुतीजवळ यशस्वी केला. आता स्लॅब कितीतरी स्वस्त झाले आहेत. त्यामुळे आता त्याचा विचार करायला हवा.
- रमेश बोडके, माजी नगरसेवक
वाहनतळ सुरू करावा-
व्यसनी लोकांचा अड्डाच झाला आहे नाल्याचा परिसर. आता झोपडपट्टीमध्येही अनेक दुचाकी वाहने असतात. ती त्यांना घरासमोर लावता येत नाहीत. त्यांच्यासाठी तसेच अन्य नागरिकांसाठी नाल्यावर वाहनतळ सुरू करायला हवा. त्यातून तिथे कायम लक्ष राहील.
- अविनाश बागवे, नगरसेवक
पोलिसांनी लक्ष द्यावे-
पोलिसांनी या भागात सातत्याने लक्ष दिले तर कितीतरी गुन्हे होण्याचे थांबेल, मात्र पोलीस असे करीत नाहीत. महापालिकेतही फक्त नाला सुधारणा, नदी सुधारणा असे प्रस्ताव मांडले जातात, होत काहीच नाही. प्रयत्नपूर्वक यात सुधारणा करणे गरजेचे आहे.
- रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक

Web Title: Pune: Citizens of crime; Nagzari; Place of goons: Municipal, Police Depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.