मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर खासगी प्रवासी बस जळून खाक, आढे गावाजवळील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:10 AM2024-04-27T11:10:52+5:302024-04-27T11:47:35+5:30

Bus Fire On Mumbai-Pune Expressway: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील  आढे गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ७८ येथे एका खासगी  प्रवासी बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.

Private passenger bus burnt down on Mumbai-Pune Expressway, accident near Aadhe village | मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर खासगी प्रवासी बस जळून खाक, आढे गावाजवळील दुर्घटना

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर खासगी प्रवासी बस जळून खाक, आढे गावाजवळील दुर्घटना

तळेगाव दाभाडे -  मुंबई -  पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील  आढे गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ७८ येथे एका खासगी  प्रवासी बसचा टायर फुटल्याने
बसने पेट घेतला. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही दुर्घटना शनिवारी (दि .२७)सकाळी सातच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त बसमध्ये ३६ प्रवासी होते. बसचालक आणि प्रवासी यांनी प्रसंगावधान राखत  बसमधून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्याजवळील आढे गावच्या हद्दीत मुंबईहून -  पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसचा टायर फुटल्याने मोठा आवाज होऊन बसने पेट घेतला. आकाशात धुरांचा लोट कोसळला होता.अपघाताचे वृत्त समजताच आयआरबी  पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा, वडगाव नगरपंचायत अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दल यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीने रौद्र रूप धारण केले होते. सुमारे सव्वा तासानंतर  आग पूर्णपणे आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र बस जळून खाक झाल्याने मोठी वित्तहानी  झाली आहे. बसचा टायर फुटून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Web Title: Private passenger bus burnt down on Mumbai-Pune Expressway, accident near Aadhe village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.