देशातंर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाची संरक्षण उत्पादने निर्मितीत खाजगी कंपन्यांनी घ्यावा पुढाकार : सुभाष भामरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 08:09 PM2019-02-05T20:09:52+5:302019-02-05T20:15:59+5:30

लष्कराला पुढील काही वर्षांकरिता कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे विचारत घेऊन त्यादृष्टीने स्वदेशी उत्पादने बनविल्यास त्याचा देशाला फायदा होईल.

Private companies should take initiative to manufacture international quality protection products in the country: Subhash Bhamre | देशातंर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाची संरक्षण उत्पादने निर्मितीत खाजगी कंपन्यांनी घ्यावा पुढाकार : सुभाष भामरे

देशातंर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाची संरक्षण उत्पादने निर्मितीत खाजगी कंपन्यांनी घ्यावा पुढाकार : सुभाष भामरे

Next
ठळक मुद्दे संरक्षण क्षेत्रातील उद्योगाचे स्वदेशीकरण: संधी आणि आव्हाने लष्कराची उत्पादनांची बाजारपेठ विकसित होण्यासाठी मोठी संधी

पुणे : तंत्रज्ञामुळे आजच्या युद्धपद्धतीत अमुलाग्र बदल झाले आहेत. नव्या तंत्रज्ञानाची रचना आणि त्यांची निर्मिती करणे आज आव्हान बनले आहे. भारत आज मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे बाहेरील देशांकडून खरेदी करत आहे. ही गरज देशांतर्गतच पूर्ण होण्यासाठी देशांच्या भविष्यातील संरक्षण विषयक गरजा लक्षात घेऊन आंतराष्ट्रीय दर्जांची संरक्षण उत्पादने बनविण्यासाठी खाजगी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी लष्करी संशोधन आणि विकास यावर येणा-या काळात लक्ष केंद्रीत करावे असे, प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले.  
मराठा चेंबर ऑफ कॉर्मस तर्फे आयोजित संरक्षण क्षेत्रातीलब उद्योंगाचे स्वदेशीकरण: संधी आणि आव्हाणेह्ण या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.  या प्रसंगी प्रसिध्द उद्योगपती बाबा कल्याणी, मराठा चेंबर आॅफ कॉर्मसचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, संचालक प्रशांत गिरबाने, ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले उपस्थित होते.
भामरे म्हणाले, पुण्याचा विकास हा औद्योगिक हब म्हणून होत आहे. या बरोबरच या ठिकाणी अनेक कंपण्या आहेत. डीआरडीओच्या अनेक प्रयोगशाळा या ठिकाणी आहेत. आज भारत एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. देशाच्या संरक्षण विषयक गरजा लक्षात घेता नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती आवश्यक आहे. युध्दभूमीवर तंत्रज्ञान वेगाने बदलत असून त्यानुसार नवीन तंत्रज्ञान आधारित उत्पादने खरेदी करण्यात मोठा पैसा खर्च केला जात आहे. नवीन तंत्रज्ञान सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने त्याअनुषंगाने सरकार, कंपन्यांनी एकत्र येत संशोधनावर भर देऊन स्वदेशी उत्पादनांची निर्मिती केली पाहिजे. लष्कराची उत्पादनांची बाजारपेठ विकसित होण्यासाठी मोठी संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन देशात निर्मित झालेली शस्त्रे निर्यात करण्याकरिता मोठा वाव आहे. यासाठी खाजगी कंपन्यांनी या उद्योगात पुढे येऊन जास्तीत जास्त गुंतवणूक करणे गजेचे आहे. येत्या काही वर्षात मोठया प्रमाणात कंपन्यांनी संशोधनावर भर देऊन चांगली उत्पादने तयार करावीत. लष्कराला पुढील काही वर्षांकरिता कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे विचारत घेऊन त्यादृष्टीने स्वदेशी उत्पादने बनविल्यास त्याचा देशाला फायदा होईल. यासाठी खाजगी कंपन्यांनी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बाबा कल्याणी म्हणाले, देशात संरक्षण क्षेत्रातील उद्योंगांना विकसीत होण्यासाठी मोठी संधी आहे. दुस-या महायुद्धात अमेरिका सर्वात शेवटी युद्धात उतरली. १९३० च्या महामंदीनंतर अनेक उद्योग डबघाईला आले होते. मात्र, तेथील तीन उद्योजकांनी एकत्र येत डीफेन्स सेक्टरची निर्मिती केली. याला अमेरिकेच्या सरकारने पांठींबा दिला. वर्ष भरात मोठ्या प्रमाणात हजारो लढाऊ जहाज, विमाने, टँक आणि गोळा बारूद यांची निर्मिती करून त्यांची विक्री केली. भारतीय कंपन्यांकडेही या प्रकारचे कौशल्य असून त्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 

Web Title: Private companies should take initiative to manufacture international quality protection products in the country: Subhash Bhamre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.