पोलीस भरती आजपासून सुरू, शहर दलात २१३ पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 06:35 AM2018-03-12T06:35:15+5:302018-03-12T06:35:15+5:30

पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाईपदांसाठी सोमवारपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी सुरू होत आहे़ त्यासाठी ४० हजार ३१५ पुरुष, तर सुमारे ८ हजार ७३५ महिलांनी अर्ज भरले आहेत.

 Police recruitment begins today, 213 posts in the city's force | पोलीस भरती आजपासून सुरू, शहर दलात २१३ पदे

पोलीस भरती आजपासून सुरू, शहर दलात २१३ पदे

googlenewsNext

पुणे - पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाईपदांसाठी सोमवारपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी सुरू होत आहे़ त्यासाठी ४० हजार ३१५ पुरुष, तर सुमारे ८ हजार ७३५ महिलांनी अर्ज भरले आहेत़
याबाबत मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले, की पोलीस भरतीसाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे़ शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात दररोज अडीच हजार जणांची चाचणी होणार आहे़ या उमेदवारांना त्यांच्या शारीरिक व मैदानी चाचणीचा दिनांक व वेळ महाआॅनलाईन मुंबईमार्फत कळविण्यात आली आहे़ पहिल्या दिवशी रजिस्टेशन व कागदपत्रांची तपासणी, दुसºया दिवशी चार मैदानी चाचण्या आणि तिसºया दिवशी बालेवाडी येथे १६०० मीटर
धावण्याची चाचणी होणार आहे़ ही चाचणी सकाळी ६ वाजल्यापासून ११ ते १२ वाजेपर्यंत चालणार आहे़
६ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू
राहणार आहे़

शिवाजीनगर मुख्यालयात चाचणी
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर या चाचणी होणार असून येणाºया उमेदवारांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे़ या भरतीसाठी असंख्य तरुण हे ग्रामीण भागातून आलेले असतात़ अनेक जण रात्री पुण्यात येतात़
त्यातील अनेकांच्या जेवणाची सोय नसते़ अशा उमेदवारांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन फूड पॅकेज देणार असतील, तर त्यांचे स्वागत केले जाईल, असे उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले़

Web Title:  Police recruitment begins today, 213 posts in the city's force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस