आजीबाईँच्या प्रामाणिकपणावर पोलिसांची कौतुकाची मोहोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:53 PM2018-05-22T19:53:12+5:302018-05-22T19:53:12+5:30

नजरचुकीने आजीबाईंनी दुसऱ्या प्रवाशाची बॅग उचलत बसने प्रवास सुरु केला. ज्या बॅगेत ७ तोळ्यांचे दागिने, ३ मोबाईल आणि रोख रक्कम होती.

police Appreciation to honesty of grand mother | आजीबाईँच्या प्रामाणिकपणावर पोलिसांची कौतुकाची मोहोर 

आजीबाईँच्या प्रामाणिकपणावर पोलिसांची कौतुकाची मोहोर 

googlenewsNext

नारायणगाव : पासष्ट वर्षाँच्या आजीबाईंनी नजरचुकीने शेजारील प्रवाशांची बॅग उचलत बसमधून प्रवास सुरु केला. काही वेळाने त्यांच्या लक्षात आले आपण चुकुन कुणा दुसऱ्याचीच बॅग आणली आहे. आहे त्याठिकाणी त्यांनी बस थांबविली आणि पुन्हा थेट नारायणगाव गाठले. आपल्याकडे आलेली ती बॅग बसस्थानकावरील पोलिसांच्या स्वाधीन करत त्यांनी नजरचुकीने ही घटना घडल्याचे कबूल केले.पोलिसांनी जेव्हा ती बॅग तपासली तेव्हा त्यात सोन्याचे दागिने, तीन मोबाईल व रोख रक्कम निदर्शनास आली. नारायणगाव पोलिसांनी आजीबाईंच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील खामुंडीच्या शितल राहुल पंडीत (रा. दौंड) या आपले वडील हरिदास किसन जगताप यांच्यासह दौंड येथे जाण्यासाठी सोमवारी (दि़.२१ मे)सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नारायणगाव एस़टी स्टॅण्डवर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या बॅग मध्ये ७ तोळे सोन्याचे दागिने, ३ मोबाईल व काही रोख रक्कम होती. काही वेळाने बॅग हरविल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याला फोन करत बस स्थानकावरुन आपली बॅग हरविल्याबाबत माहिती दिली़. पोलिसांनी बस स्थानकासह आजूबाजूच्या परिसरात बॅगचा शोध सुरू केला़  त्यावेळी स्थावकावर एका पासष्ठ वर्षाँच्या आजीबाईंनी बॅग आणून दिल्याचे पोलिसांना समजले. तक्रार दाखल करणाऱ्यांकडून बॅगेतील सर्व दागिने, मोबाईल, पैसे याविषयी खात्री करुन घेत त्यांना ती बॅग परत केली. यावेळी आजीचा प्रामाणिकपणा पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी त्यांचा सन्मान केला़.  

Web Title: police Appreciation to honesty of grand mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.