PMPML ची पर्यटन बससेवा आता केवळ ५०० रूपयांत; ५ मार्गावरील दरात तब्बल ५० टक्के सवलत

By निलेश राऊत | Published: May 2, 2023 07:07 PM2023-05-02T19:07:57+5:302023-05-02T19:08:33+5:30

नागरिकांना यापुढे माफक दरात पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देऊन परत येता येणार...

PMPML's Tourist Bus Service Now Only Rs 500; As much as 50 percent discount on route 5 fare | PMPML ची पर्यटन बससेवा आता केवळ ५०० रूपयांत; ५ मार्गावरील दरात तब्बल ५० टक्के सवलत

PMPML ची पर्यटन बससेवा आता केवळ ५०० रूपयांत; ५ मार्गावरील दरात तब्बल ५० टक्के सवलत

googlenewsNext

पुणे :पीएमपीएमएलने पर्यटन सेवेच्या सातही मार्गावर सुधारित दर लागू केले असून, पाच मार्गावरील दरात तब्बल ५० टक्के सवलत देऊन हा दर हजार रूपयांवरून ५०० रूपयांवर आणण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना यापुढे माफक दरात पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देऊन परत येता येणार आहे.

पीएमपीएमएलने १६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता वातानुकुलित ई बसेसव्दारे विशेष बससेवा सुरू केली होती. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार व रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी १ मे पासुन ही सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु या बससेवेचे दर जास्त असल्याने प्रवासी नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. सोशल मिडियावर याबाबत नागरिकांनी नापासंतीही व्यक्त केली. त्यामुळे परिवहन महामंडळाने व महामंडळाचे अध्यक्ष यांनी या पर्यटन बसेसेवेच्या दरात सवलत देण्याचा निर्णय घेऊन सुधारित दर जाहिर केले आहेत.

पर्यटन मार्ग, जुने दर व सुधारित दर
१. मार्ग :- हडपसर, मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसर
जुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /-
२. हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोढणपूर मंदिर, हडपसर
जुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /-
३.  मार्ग : डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन
जुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /-
४. मार्ग : पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगाव धरण, पुणे स्टेशन
जुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /-
५. मार्ग : पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणे स्टेशन
जुना दर ( प्रति व्यक्ती ) : ७०० /-, नवा दर :- ५०० /-
६. मार्ग : पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर, वाडेबोल्हाई, तुळापूर, राजंणगाव पुणे स्टेशन
जुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /-
७. मार्ग : भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर रावेत, मोरया गोसावी मंदिर, प्रतिशिर्डी शिरगाव, देहू, आळंदी, निगडी
जुना दर ( प्रति व्यक्ती ) : ७०० /-, नवा दर :- ५०० /-

Web Title: PMPML's Tourist Bus Service Now Only Rs 500; As much as 50 percent discount on route 5 fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.