मध्यभागातील रस्त्यावर ब्रेक डाऊन बंदच          

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 09:02 PM2019-05-09T21:02:11+5:302019-05-09T21:03:58+5:30

शहराच्या मध्यभागात अचानक बंद पडणाºया पीएमपीएल च्या गाड्या यापुढे रस्त्यावर आणल्याच जाणार नाहीत. त्याऐवजी शहरातील सर्व हमरस्त्यांवर नव्या, चांगल्या बस वापरण्याचा निर्णय पीएमपीएल व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला

PMPML buses still faced break down on road | मध्यभागातील रस्त्यावर ब्रेक डाऊन बंदच          

मध्यभागातील रस्त्यावर ब्रेक डाऊन बंदच          

पुणे: शहराच्या मध्यभागात अचानक बंद पडणाºया पीएमपीएल च्या गाड्या यापुढे रस्त्यावर आणल्याच जाणार नाहीत. त्याऐवजी शहरातील सर्व हमरस्त्यांवर नव्या, चांगल्या बस वापरण्याचा निर्णय पीएमपीएल व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार विजय काळे यांनी यावरून पीएमपीएल वर टीका करत त्यांच्याच कार्यालयात गुरूवारी बैठक घेतली. 
पीएमपीएल च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय तुळपुळे, मुख्य अभियंता  बुरसे, वाहतूक व्यवस्थापक वाघमारे, भांडार प्रमुख रूपनवर, जाहिरात विभागाचे रॉड्रीक्स, प्रशासन अधिकारी गायकवाड आदी बैठकीला उपस्थित होते. पीएमपीएल बाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत काळे यांनीच अशा बैठकीची मागणी गुंडे यांच्याकडे केली होती. त्याप्रमाणे गुरूवारी झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.पीएमपीएमएलच्या स्वत:च्या मालकीच्या १ हजार ३६१ बसेस रस्त्यावर धावतात. त्याशिवया भाडे तत्वावरील ५७७ व इलेक्ट्रिक २५ बस रस्त्यावर आहेत. भाडे तत्वावर घेतलेल्या गाडट्यांचे ठेकेदार कंपनीला किलोमीटरप्रमाणे पैसे दिले जातात. त्यांची एकही बस बंद पडणे गैर असताना एकूण २० टक्के बसेस दररोज ब्रेक डाउन होत असतात. रस्त्यावर धावत असलेली गाडी अचानक बंद पडल्याने त्याचा वाहतूकीला त्रास होतो असे काळे यांनी बैठकीत सांगितले. बंद पडलेल्या पीएमपीएल गाडीमुळे वाहतूक कोंडीला निमित्त मिळते असे ते म्हणाले. 

-शेजारीशेजारी बसस्टॉप सर्व्हे करून त्यातील अनावश्यक बसस्टॉप काढून टाकण्यात येतील.


 -खरेदी करण्यात आलेल्या सुट्या भागांना तज्ज्ञ संस्थांकडून प्रमाणित करून घेण्यात येईल.


-वाहनांना लागणाºया आगीपासून बचावाचे प्रशिक्षण कर्मचाºयांना देणे


-नव्याने समाविष्ट होणाºया ४०० सीएनजी बससाठी नवी दिल्लीच्या डीटीडीसी धर्तीवर कर्मचाºयांसाठी गुणवत्ता सुधारणा कार्यशाळा घेणे


 -कंपनीच्या वास्तूत सुट्या भागांचे दुकान सुरू करणे


-खडकीमध्ये बसस्थानक सुरू करणे


 -खडकी, साप्रस, औंध ,औंधगाव, रेंजहिल्स, बोपोडी, बाणेर या ठिकाणी बसवाहतूक सुरू करणे


- शहरातील सर्व बसथांभ्यावर  येण्याजाण्याचे त्याठिकाणी खडकी कॅन्टोंनमेंट बोर्डाच्या मदतीने नव्याने बीओटी तत्वावर खडकी बस स्थानक विकसित करण्याला मान्यता

Web Title: PMPML buses still faced break down on road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.