सुरक्षेच्या कारणास्तव पीएमपी संचलन गुरुवारी बंद : १४ मार्गावरील बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 08:38 PM2018-08-08T20:38:59+5:302018-08-08T20:41:36+5:30

एकूण १४ मार्गावर बदल करण्यात आले असून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक नियंत्रण कक्ष २४ तास सुरु राहणार आहेत. 

PMP closed on Thursday due to security : 14 changes on route | सुरक्षेच्या कारणास्तव पीएमपी संचलन गुरुवारी बंद : १४ मार्गावरील बदल

सुरक्षेच्या कारणास्तव पीएमपी संचलन गुरुवारी बंद : १४ मार्गावरील बदल

Next
ठळक मुद्देनिगडी ते चाकण हे बसमार्ग बंद ठेवण्यात येणारसुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक नियंत्रण कक्ष २४ तास सुरु राहणार

पुणे : पीएमपी प्रशासनाच्यावतीने शहर व हद्दीलगतच्या उपनगरांमध्ये होणा-या पीएमपीच्या संचलनामध्ये बदल केले आहेत. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणच्या मार्गावरील संचलन बंद ठेवण्याचा निर्णंय घेतला आहे. एकूण १४ मार्गावर बदल करण्यात आले असून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक नियंत्रण कक्ष २४ तास सुरु राहणार आहेत. 
पुणे शहर व शहरहद्दीबाहेरील संचलित बसमार्गांचे पुढीलप्रमाणे असणार आहे. यात पुणे नाशिक रस्त्यावरील संचलित सर्व बसमार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे - मुंबई रस्त्याने निगडीच्या पुढे देहुगांव,वडगांव, कामशेत व किवळेकडे जाणारे बसमार्ग बंद असणार आहेत. पौड रस्त्यावरील बसमार्ग केवळ चांदणी चौकापर्यंत सुरु राहणार आहेत. तर वडगाव धायरीच्या पुढील सर्व बसमार्ग वडगाव धायरी पर्यंतच सुरु राहणार आहेत. मांडवी बहुली रस्त्यावरील बसमार्ग वारजे माळवाडीपर्यंत सुरु राहणार आहे. पुणे सातारा रस्त्याने नसरापूर, कोंढणपूर, शिवापूरकडे जाणारे बसमार्गकात्रजपर्यंतच ठेवण्यात येणार आहे. बोपदेव घाटामार्गे जाणा-या बस येवलेवाडी पर्यंत, हडपसर - सासवड रस्त्याने संचलनात असणारे बसमार्ग फुरसुंगीपर्यंत ठेवण्यात येणार आहे.पुणे सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी आगारापर्यंत आणि पुणे नगर रस्त्यावरील सर्व बसमार्ग वाघोलीपर्यंत सुरु राहणार आहे. तर हडपसर वाघोली मार्ग, आळंदी रस्ता (आळंदी ते वाघोली मार्गे मरकळ हा मार्ग बंद राहणार आहे) निगडी ते चाकण हे बसमार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले. 

Web Title: PMP closed on Thursday due to security : 14 changes on route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.